spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

Strawberry Banana Shake Recipe : सकाळी नाश्त्यात बनवा ‘हा’ पौष्टीक शेक; नक्की लिहून घ्या याची रेसिपी

हिवाळ्यात स्ट्रॉबेरी बाजारात सहजपणे उपलब्ध असते. या स्ट्रॉबेरीचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत. त्याचबरोबर स्ट्रॉबेरीपासून आपण वेगवेळ्या डिश देखील बनवू शकतो. तर अश्याच एका पौष्टीक शेकची रेसिपी बघूया.

काही लोकांना स्ट्रॉबेरी अशीच खायला आवडते तर काहीनां स्ट्रॉबेरी आईस्क्रिम आवडते. पण या स्ट्रॉबेरीचे फायदे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. स्ट्रॉबेरीमध्ये गूळ आणि शर्करेचे प्रमाण कमी असल्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी ही चांगली निवडक आहे. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे त्वचा सुरकुत्या आणि जास्त तेल कमी करण्यात मदत करतात. स्ट्रॉबेरीमध्ये प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवते. त्याचबरोबर केळ्याचे गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायद्याचे आहेत. केळीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात, जे हाडांचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. केळ्यातील पोटॅशियम आणि स्ट्रॉबेरीतील अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. केळीमध्ये नैसर्गिक साखरेचा स्रोत असतो, ज्यामुळे ऊर्जा वाढते.

स्ट्रॉबेरी आणि केळीच्या मिश्रणामुळे चव अजूनच चांगली आणि लज्जतदार होते.स्ट्रॉबेरी आणि केळी दोन्ही घटक शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. या शेकमधून शरीराला आवश्यक असलेले सर्व प्रमुख पोषक तत्वे मिळतात, जे शरीराचे सामर्थ्य वाढवतात.

स्ट्रॉबेरी बनाना शेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
> दूध
> २ स्कुप व्हॅनिला किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड प्रोटीन पावडर
> १ केळ
> १ कप फ्रोजन स्ट्रॉबेरी
> २ टेस्पून ग्राउंड फ्लेक्स

शेक बनवण्याची कृती
स्ट्रॉबेरी आणि बनाना शेक बनवण्याआधी ती स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर ती बारीक करा. केळी सोलून छोटे छोटे तुकडे करा. एका मिक्सरमध्ये स्ट्रॉबेरीचे आणि केळीचे तुकडे टाका. त्यात दूध, व्हॅनिला किंवा स्ट्रॉबेरी प्रोटीन पावडर टाका. जवस टाका आणि हे मिश्रण चांगले मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तयार शेक ग्लासमध्ये काढून सर्व्ह करू शकता.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss