spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

‘समर कुलर ड्रिंक’! उन्हाच्या तडाख्यात ताजेतवाने राहण्यासाठी ‘हे’ एनर्जी ड्रिंक नक्की करून पहा…

लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. त्यामुळे सर्वांना काही तरी थंडगार प्यावसं वाटतं. उन्हाळ्यात योग्य हायड्रेशनसाठी जूस किंवा पाणी पिणे खूप महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात ताज्या फळांचा रस (जसे लिंबूपाणी, संत्रं, अननस, केळी) शरीराला हायड्रेट ठेवतो. हे रस पिण्याने शरीरात आवश्यक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात. पण जर तुम्हाला हायड्रेटिंग आणि रिफ्रेशिंग ज्यूस बनवायचं असेल, तर तुम्ही ‘हे’ एनर्जी ड्रिंक बनवून शकता. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे आपल्याला सातत्याने तहान लागत राहते.

उन्हाळ्यात गरम चहा, कॉफी किंवा हॉट चॉकलेटपेक्षा थंड पेय (पाणी, रस, लिंबू पाणी, नारळ पाणी) अधिक योग्य ठरतात. खाण्यामध्ये हायड्रेटेड पदार्थांचा समावेश असावा. पाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पचन व्यवस्थेत सुधारणा होते. त्याचबरोबर पाण्यात असलेले व्हिटॅमिन C आपल्याला ऊर्जा देतात. उन्हाळ्यात जास्त करून नारळ पाण्याचे सेवन करा. नारळ पाणी हे एक नैसर्गिक आणि ताजेतवाने करणारे पेय आहे. यामध्ये अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत, जे शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. तर यंदाच्या उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेड ठेवण्यासाठी ‘समर कुलर ड्रिंक’ नक्की करून बघा.

समर कुलर ड्रिंक बनवण्याचे साहित्य
शहाळ्याचे पाणी – २ कप
बीटरूट – १/२ कप (किसून घेतलेले)
सफरचंद – १/२ कप (किसून घेतलेले)
स्ट्रॉबेरी – १/२ कप (किसून घेतलेले)
द्राक्षे – १/२ कप (किसून घेतलेले)
अननस – १/२ कप (किसून घेतलेले)
लिंबू रस – २ टेबलस्पून

समर कुलर ड्रिंक बनवण्याची कृती
सर्वप्रथम एक मोठी काचेची बाटली घ्या. त्या बाटलीत शहाळ्याचे पाणी घेऊन त्यानंतर त्यात आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या फळांचे लहान लहान तुकडे करून त्या पाण्यात घाला (उदा. बीटरूट, सफरचंद, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, अननस) त्यानंतर एक गाळणी आणि मध्यम आकाराची वाटी घ्या. ती गाळणी घेऊन त्यात बीटाचा किस घालून हाताने दाबून रस काढून घ्या. हा रस त्या बाटलीत ओता. सगळ्यात शेवटी यात लिंबाचा रस घालून सगळे मिश्रण एकजीव करा. मग १ ते २ तास फ्रिजमध्ये थंड करून घ्या. काचेच्या ग्लासात पुदिन्याच्या पानांची सजावट करत हे समर कुलर ड्रिंक तुम्ही सर्व्ह करू शकता.

हे ही वाचा : 

Bank Holidays in April 2023, एप्रिल महिन्यात बँका तब्बल १५ दिवस बंद, जाणून घ्या सुट्ट्याची यादी

Chaitra Navratri Sabudana Kheer Recipe, उपवास आहे? तर घरच्या घरी बनवा साबुदाणा खीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss