गणेशोत्सव हा सण जल्लोशाचे,चैतन्याचे आणि ऊत्साहाचे प्रतीक आहे.महाराष्ट्रात तर हा सण खुप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.घरोघरी फुलांची आरास सजलेली असते.धूप-दीपांचा सुगंध दारोदारी दरवळत असतो.पुर्विच्या काळी एक-दोन प्रकारचेच मोदक बनवले जायचे परंतु काळानुसार त्यात बदल होत आहेत.आपण पारंपारिकतेला अधुनिकतेचा साज देत वेगळेपण जपुन परफेक्ट पारंपरिक रेसिपी जाणून घेऊयात. गणपतीसाठी वेगवेगळ्या खिरापती केल्या जात असल्या तरी पहिला मान असतो तो खोबऱ्याच्या खिरापतीला. सुक्या खोबऱ्याची खिरापत आणि पंचखाद्याची खिरापत ही प्रसाद म्हणून वाटण्यासाठी पहिले केली जाते. अनेक घरांमध्ये गणपती उत्सवाची तयारी म्हणून आधी खिरापत तयार केली जाते.
खोबऱ्याच्या खिरापतीला लागणारे साहित्य :
३/४ कप किसलेले सुके खोबरे (सुक्या खोबर्याची १/२ वाटी)
१ टेस्पून खसखस
१५० ग्राम खडीसाखर
४ वेलचींची पूड
६ ते ७ खारका
८ ते १० बदाम
खोबऱ्याच्या खिरापतीला लागणारी कृती :
प्रथम ६ ते ७ खारका घ्याव्या. त्यानंतर खारकांच्या बिया काढून टाकाव्यात आणि खारकांची पूड मिक्सरच्या साहाय्याने करून बाजूला ठेवावी. मग ८ ते १० बदाम घ्यावे. आईनी त्या बदामाची सुद्धा मिक्सरच्या साहाय्याने पूड करू घावी आणि वेळा भांड्यात करून ठेवावी. त्यानंतर १ ते २ सुक्या खोबऱ्याच्या वाट्या खीसून घ्याव्या. आणि किसलेले सुके खोबरे मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. भाजलेले खोबरे परातीत काढावे. त्यानंतर खसखस ची खलबत्त्यात कुटून घ्यावी. मग पूड करून घयावा आणि ती मंद आचेवर खसखस भाजून घ्यावी. बदामाची पूड आणि खारकांची पूड मध्यम आचेवर भाजून घ्यावी. खुप जास्त भाजू नये नाहीतर करपू शकते. त्यामध्ये खडीसाखर खलबत्त्यात थोडी कुटून घ्यावी. भाजलेले खोबरे, भाजलेले खसखस, भाजलेली बदाम-खारकांची पूड, खडीसाखर आणि वेलचीपूड एकत्र करून मिक्सरमध्ये भरडसर खिरापत तयार करून घ्यावी.
हे ही वाचा:
गणपती बाप्पाच्या प्रसादाला करा तळलेले मोदक
अक्षय कुमारनं शेअर केला ‘वेलकम टू द जंगल’ चा धमाकेदार टीझर…