Monday, November 13, 2023

Latest Posts

यंदा दिवाळीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट काजू कतली…

काजू बर्फी किंवा काजू कतली हा पदार्थ खूप लोकप्रिय आहे. विशेषत: दिवाळीसारख्या मोठ्या सणांमध्ये ते बनवले जाते.

दिवाळी या सणाला सुरुवात ही झाली आहे. प्रत्येकाच्याच घरात दिवाळीची जोरदार तयारी ही सुरु आहे. बाजारात दिवाळीची चमक स्पष्टपणे पाहायला मिळते. पण या सगळ्यांशिवाय दिवाळीची आवड वाढवते ती म्हणजे दिवाळीला तयार होणाऱ्या स्वादिष्ट पदार्थांमुळे. त्यामुळे तुम्हालाही या दिवाळीत बाजारातून खरेदी करण्याऐवजी घरीच काही गोडाचे पदार्थ बनवायचे असतील तर तुम्ही ही गोड पदार्थ बनवू शकता. काजू बर्फी किंवा काजू कतली हा पदार्थ खूप लोकप्रिय आहे. विशेषत: दिवाळीसारख्या मोठ्या सणांमध्ये ते बनवले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की काजू हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काजूपासून अनेक प्रकारच्या पाककृती बनवता येतात. चला तर मग उशीर न करता रेसिपीकडे वळूया.

काजू कतली बनवण्यासाठी साहित्य

  • काजू – २ वाटी
  • साखर – १ वाटी (चवीनुसार)
  • गाईच तूप – ४ चमचे
  • वेलची पावडर – १/२ चमचे

काजू कतली कशी बनवायची –

सर्वात आधी काजूचे काप करून एका वाटीत घ्या. काप झाले की ते सर्व काजू मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्या. यानंतर, काजू पावडर चाळणीत टाकून चाळून घ्या. जेणेकरून काजूचे जाड तुकडे यात राहणार नाही. हे जाड तुकडे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून चाळून त्या पावडर मध्ये मिक्स करा. एका पातेल्यात साखर आणि अर्धी वाटी पाणी घालून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. काही वेळाने साखर पाण्यात चांगली मिसळली की त्यात काजू पावडर घालून मिक्स करा आणि गॅस बारीक करा.

हे काजूचे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यात मिश्रणात वेलची पावडर आणि तूप घालून मिक्स करा. नंतर गॅस बंद करा. आता एक प्लेट किंवा ट्रे घ्या आणि त्याच्या तळाशी तूप चांगले लावा. आणि तयार केलेली पेस्ट प्लेटमध्ये ठेवा आणि ती फिरवत राहा जेणेकरून पेस्ट लवकर थंड होईल. पेस्ट थोडी गरम राहिली की बटर पेपरवर थोडं तूप लावून घ्या. या सारणाचे हाताने मोठे मोठे गोळे करून बटर पेपर वर पसरवून घ्या तुम्ही यासाठी लाटण्याचीही मदत घेऊन शकतात. त्यानंतर सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. काजू कटलीचे मिश्रण सेट झाल्यानंतर चाकूच्या मदतीने हिऱ्याच्या आकारात कापून घ्या. आता तुमची स्वादिष्ट काजू कतली तयार आहे.

हे ही वाचा : 

दिवाळीत तयार झाल्यानंतर फोटोशूटसाठी कसे फोटो काढायचे, तर करा ‘या’ सहा टिप्स

आजचे राशिभविष्य,१० नोव्हेंबर २०२३;नशिबावर हवाला ठेवून न राहता…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss