spot_img
spot_img

Latest Posts

यंदा Raksha Bandhan निम्मित बनवा स्वादिष्ट काजूचा हलवा

श्रावणातील सणांना आता सुरुवात झाली आहे. त्यामध्ये रक्षाबंधन हा सण जवळ आला आहे. सगळ्या बहिणींनी भावाला राखी बांधण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

श्रावणातील सणांना आता सुरुवात झाली आहे. त्यामध्ये रक्षाबंधन हा सण जवळ आला आहे. सगळ्या बहिणींनी भावाला राखी बांधण्यासाठी तयारी सुरु केली आहे. भाऊसुद्धा बहिणीला काय गिफ्ट द्यायचं याची तयार करत असतील. या सणाचा दिवशी आपण काहींना काही गोड पदार्थ बनवत असतो. अशातच तुम्ही रक्षाबंधनला भावासाठी खास काजूचा शिरा देखील बनवू शकता. काजी हे असे ड्राय फ्रुट आहे जे सर्वाना आवडते. तसेच रव्याचा आणि बदामाचा शिरा खाऊन कंटाळा असाल तर काजूचा शिरा नेमका कसा बनवायचा हे सविस्तर घ्या जाणून

साहित्य:-
२ कप काजू
२०० ग्राम साखर
केशर थोडी
१ चमचा वेलदोडा पावडर
२०० ग्राम तूप
२ कप किसलेले नारळ
अर्धा कप कोमट पाणी

कृती:-
सर्वप्रथम काजू घेऊन ते कढईत चांगले भाजून घ्या. त्यानंतर काजू थंड करून घ्या. थंड करून झाल्यानंतर मिक्सर मधून त्या काजूची बारीक पावडर करून घ्या. हे सर्व करून झाल्यानंतर एका वाटीत दूध घेऊन त्यात केसर टाकून ठेवा. त्यानंतर एका कढईत तूप गरम करायला ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात काजूची बारीक पावडर आणि किसलेला नारळ टाकून भाजून घ्या. हे सर्व नीट भाजून झाल्यांनतर त्यात हळू हळू पाणी टाकून ते जोरजोरात मिक्स करून घ्या. त्या पाण्यातील किसलेल खोबर आणि काजूची पावडर चांगली मिक्स झाल्यानंतर त्यात साखर टाकून चांगलं मिक्स करून घ्या. हे सर्व करताना गॅसची फ्लेम कमी ठेवा. आता त्यात केसरच दूध, आणि वेलदोडे पावडर टाकून मिक्स पुन्हा मिक्स करून घ्या. हे सर्व केल्यांनतर गॅस बंद करून घ्या. नंतर ते एका भांडयात काढून त्यावर सुखा मेवा टाकून घ्या. तयार आहे काजूचा हलवा.

हे ही वाचा:

Parbhani मध्ये पावसाची तुफान बॅटिंग, तर अजित पवार कारने पोहचले बीडला…

ठाणे पालिकेतील सफाई खात्यात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ४५ कामगारांना थकीत वेतन मिळणार…

Uddhav thackeray यांनी हिंगोलीतून सरकारवर केली जोरदार टीका, शासन आपल्या दारी, थापा मारते…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss