गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहेत. गणपती बापाचा सण हा चतुर्थी पासून चालू होतो. दहा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला गणपती विसर्जन करून संपतो. दहा दिवसांत गणपतीला १० वेगवेगळ्या वस्तू या अर्पण केल्या जातात. गणेश चतुर्थीचा सण मोदक केल्या शिवाय अपूर्णच मानला जातो. गणेश चतुर्थीला खास बनवण्यासाठी आणि गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही घरी सहज मूग डाळीचे मोदक बनवू शकता. झटपट होणारे आणि चविष्ट लागणारे मुगाच्या डाळीचे मोदक कसे करायचे ते जाणून घेऊया.
साहित्य –
२ कप मूग डाळ
३ कप तांदळाचे पीठ
५० ग्रॅम गूळ
१ टीस्पून वेलची पावडर
२ चमचे पिठी साखर
१ कप दूध
१ चिमूटभर मीठ
पाणी (आवश्यकतेनुसार)
कृती –
सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवून. त्यात एक कप पाणी गरम करा. पाणी गरम झाल्यावर त्या पाण्यात गूळ घाला आणि ते ढवळत असताना मंद आचेवर ५ मिनिटे नीट शिजवा. गुळाचे पाक हे घट्ट होऊ लागल्यावर त्यात अर्धा कप दूध आणि वेलची पूड घाला. साधारण ५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. आता या मिश्रणात मूग डाळ आणि एक कप पाणी घालून पॅनवर झाकन लावून ठेवा. त्यानंतर गॅस कमी करा आणि डाळ शिजू द्या. थोड्या वेळा नंतर गॅस बंद करून ते मिश्रण थंड होऊ द्या. दुसऱ्या भांड्यात तांदळाच्या पिठात साखर आणि मीठ घाला. अर्धा कप दूध गरम पाण्यात मिसळा आणि त्याच्या मदतीने तांदळाचे पीठ थोडे मऊ मळून घ्या. आता थोडे पीठ घेऊन गोलाकार करून चपटा करून त्यात गूळ मुगाच्या डाळीचं मिश्रण टाकून ते पिठात बंद करून मोदकाचा आकार द्या. त्याचप्रमाणे सर्व गूळ मुगाच्या डाळीच्या मिश्रणापासून मोदक तयार करा. तयार केलेले मोदक स्टीलच्या भांड्यात ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये पाणी घाला आणि त्यात मोदक असलेले भांडे ठेवून कुकर झाकून ठेवा. साधारण १५ मिनिटे मोदक वाफेवर ठेवा. यानंतर ते बाहेर काढून थंड करा. तयार आहेत सोप्या पद्धतीने केलेले मुगाच्या डाळीचे झटपट आणि चविष्ट मोदक.
हे ही वाचा:
पावसाळ्याच्या दिवसात खूप आळस आणि थकवा येतोय? मग ‘हे’ Energy boost food नक्की ट्राय करा
हरतालिकेच्या पूजेचं महत्व, मुहूर्त आणि पूजा कशी करायची? जाणून घ्या