spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

पोळी भाजीचा कंटाळा आलाय? तर ढाबा स्टाईल राजमा चावल नक्की करून पहा…

राजमा या कडधान्यांमध्ये प्रथिने, फायबर, लोह, आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. तांदळाबरोबर खाल्ल्यास तो संतुलित आहाराचा उत्कृष्ट प्रकार ठरतो.

राजमा चावल हा एक लोकप्रिय आणि पौष्टिक भारतीय पदार्थ आहे जो उत्तर भारतात विशेषतः खूप प्रसिद्ध आहे. याचे महत्त्व विविध प्रकारे दिसून येते. राजमा या कडधान्यांमध्ये प्रथिने, फायबर, लोह, आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. तांदळाबरोबर खाल्ल्यास तो संतुलित आहाराचा उत्कृष्ट प्रकार ठरतो. ही डिश शरीराला ऊर्जा देऊन दीर्घकाळ पोट भरलेले वाटायला मदत करते. राजमा चावल हा पदार्थ पंजाब, हरियाणा दिल्ली या भागात विशेषतः लोकप्रिय आहे. चला तर मग आज आपण राजमा चावलची रेसिपी पाहूया.

साहित्य:

राजमा करीसाठी:

  • १ कप राजमा (रात्रभर पाण्यात भिजवलेला)
  • २ मध्यम कांदे (बारीक चिरलेले)
  • २ मध्यम टोमॅटो (पेस्ट बनवलेली)
  • २ चमचे आलं-लसूण पेस्ट
  • २ चमचे तेल
  • १ चमचा जिरे
  • १ चमचा हळद
  • १ चमचा लाल तिखट
  • १ चमचा धने पावडर
  • १ चमचा गरम मसाला
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर सजावटीसाठी

भातासाठी:

  • १ कप तांदूळ
  • २ कप पाणी
  • १ चमचा तेल किंवा तूप
  • मीठ चवीनुसार

 कृती:

राजमा करी:

  • राजमा रात्रभर भिजवल्यानंतर प्रेशर कुकरमध्ये ३-४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.
  • एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे टाका आणि फोडणीला परतून घ्या.
  • कांदे घालून सोनेरी होईपर्यंत परतवा.
  • आलं-लसूण पेस्ट घालून १-२ मिनिटे परता.
  • टोमॅटो पेस्ट घालून चांगले शिजवा, तोपर्यंत मसाला तेल सोडू लागतो.
  • हळद, लाल तिखट, धने पावडर आणि मीठ घालून मिक्स करा.
  • शिजवलेला राजमा आणि त्याचे पाणी घालून चांगले मिक्स करा.
  • मंद आचेवर १०-१५ मिनिटे उकळवा, नंतर गरम मसाला घाला आणि कोथिंबिरने सजवा.

भात:

  • तांदूळ स्वच्छ धुऊन १५ मिनिटे भिजवून ठेवा.
  • भात कुकर किंवा पॅनमध्ये २ कप पाणी, तेल किंवा तूप, आणि मीठ घालून शिजवा.
  • भात मोकळा करून थोडा गार होऊ द्या.
  • अधिक चविष्ट बनवण्यासाठी थोडा लोणी (बटर) घालून सर्व्ह करा.

हे ही वाचा:

कांदे-भुजबळ प्रकरणात Sanjay Raut यांनी Devendra Fadnavis यांवर साधला निशाणा

मुख्यमंत्र्यांच्या Thane जिल्ह्याचा कौल कोणाच्या दिशेने ? मतदारांच्या टक्केवारीत झाली वाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss