प्रत्येकाला वांग्याची भाजी आवडतेच असे नाही. त्यामुळे त्याची भजी केली तर ती आवडीने खाल्ली जाते. त्याचसोबत वांग्याचे काप जर तुम्ही कधी खाल्ले नसतील तर कुरकरीत असे वांग्याचे काप कास बनवायचे याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. वांग्याच्या कापासारखेच तुम्ही बटाट्याचे, सुरणाचे कापही करू शकता.
वांग्याचे काप रेसिपी (शॅलोफ्राय वांग्याचे काप)
साहित्य:
- २ मध्यम आकाराची वांगी
- १/४ कप बारीक रवा
- ४ चमचे तांदळाचे पीठ
- १/२ चमचा हळद
- १ चमचा लाल तिखट
- १/२ चमचा धने पूड
- १/२ चमचा जिरे पूड
- १ चमचा लिंबाचा रस
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल
कृती:
- वांगी धुवून पातळ गोलसर काप (स्लाइस) करा. कापलेले वांगी पाण्यात ठेवा जेणेकरून ते काळे होणार नाहीत.
- एका मोठ्यात वांग्याचे काप घेऊन हळद, लाल तिखट, धने पूड, जिरे पूड, लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करा.
- एका भांड्यात तांदळाचे पीठ आणि रवा एकत्र करून घ्या. त्यात मसाला लावून ठेवलेले वांग्याचे काप त्यात मिश्रणात घोळून घ्या.
- पॅनमध्ये तेल गरम करा. पीठात बुडवलेले वांग्याचे तुकडे गरम खरपूस शॅलोफ्राय करून घ्या. दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत फ्राय करून घ्या.
हे ही वाचा :