Tuesday, May 30, 2023

Latest Posts

कोकणातील ही सुप्रसिद्ध भाजी एकदा तरी नक्की ट्राय करा, जाणून घ्या ओल्या काजूची स्पेशल रेसिपी

कोकण हे फक्त समुद्र निसर्ग आणि आंब्यांसाठी प्रसिद्ध नसून काजु साठीही तितकेच प्रसिद्ध आहे. काजू म्हणजे कोकणाची शान आहे. कोकणातील अगदी प्रख्यात असलेले काजू गर आणि त्यांची रस्सा भाजी ही अतिशय चविष्ट लागते. साधारण उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच मार्च एप्रिल पासून ओले काजू हे बाजारात विक्रीसाठी येतात.

कोकण हे फक्त समुद्र निसर्ग आणि आंब्यांसाठी प्रसिद्ध नसून काजु साठीही तितकेच प्रसिद्ध आहे. काजू म्हणजे कोकणाची शान आहे. कोकणातील अगदी प्रख्यात असलेले काजू गर आणि त्यांची रस्सा भाजी ही अतिशय चविष्ट लागते. साधारण उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच मार्च एप्रिल पासून ओले काजू हे बाजारात विक्रीसाठी येतात. प्रत्येक कोकणी माणसाला ही भाजी प्रचंड आवडते. त्यामुळे कोकणात तर ही भाजी सातत्याने केली जाते.

ही भाजी बनवताना तुमच्या मधील काही जणांना फार अवघड वाटत असेल. पण त्याचे कारण म्हणजे काजूगरांची सालं काढण्यासाठी जरासा वेळ लागतो त्यात तुमच्या हाताला चीक लागू शकतो पण त्याला एक दुसरा उपाय आहे तो म्हणजे काजू गरम पाण्यात वाफवून घेणे. त्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो. पण तुमच्यातल्या अनेकांनी ही ओल्या काजूची भाजी खाली नसेल किंवा बनवता येत नसेल तर काळजी करू नका. आम्ही आज घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास ओल्या काजूच्या भाजीची चविष्ट रेसिपी

ओल्या काजूची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

पाव किलो ओले काजू गर, छोटे कांदे व टोमॅटो प्रत्येकी २ २, अर्धी वाटी किसलेलं खोबरं, लसणीच्या ४ पाकळ्या, आलं लसूण पेस्ट १ मोठा चमचा, कढीपत्त्याची पाणी ५ते ६ चांगली धुवून घ्यावी, गरम मसाल्याची पावडर २ चमचे, हळद पाव चमचे, साधारण २ ते ३ मोठे चमचे भरून तेल, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्या आवडीप्रमाणे.

ओल्या काजूची भाजी बनवण्यासाठी लागणारी कृती –

सर्वप्रथम गॅस लावून त्यावर एक कढई ठेवा. त्या कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेऊन त्यात चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून त्याला तेल सुटेपर्यंत चांगल्याप्रकारे परतवून घ्या. त्यानंतर त्यात किसलेले ओलं खोबरं घालून ते तेलावर चांगल्याप्रकारे भाजून घ्यावे. तसेच त्यामध्ये लसणीच्या पाकळ्या घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करा. सर्व मिश्रण थंड करून घ्या.

त्यानंतर मिक्सर मधून अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे. तसेच लक्षात ठेवा या वाटणामध्ये पाण्याचा वापर अगदी नावापुरता करा. असे करून तुम्ही वाटण तयार करून घ्या. सुरुवातीला वापरलेल्या कढईमध्ये २ चमचे तेल गरम करत ठेवा आणि त्यात आलं लसूणची पेस्ट घाला आणि साधारण १ मिनिट चांगले परतून घ्या. नंतर कांदा खोबऱ्याचे वाटप घालून ते चांगले एकत्रित करून घ्या. त्यांनतर मसाल्याला जर तेल सुटू लागल्यावर तुम्ही त्यात हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. परत ते मिश्रण चांगल्याप्रकारे एकत्र करा आणि त्यात ओले काजूगर घाला.

तुमच्या आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून व्यवस्थित १० ते १५ मिनिटे शिवून घ्या. जर तुम्हाला भाजीत बटाटे घातलेले आवडत असतील तर तुम्ही बटाटे सुद्धा टाकू शकता. भाजी १० ते १५ मिनिटे शिजल्यावर ती व्यवस्थित तयार होईल आणि त्यावर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे व आवश्यकते प्रमाणे चिरलेली कोथिंबीर टाकू शकता. अश्याप्रकारे तुमची ओल्या काजूच्या बियांची चमचमीत भाजी तयार होईल. तुम्ही हि भाजी गरमागरम चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता.

हे ही वाचा : 

२ जूनला उडणार ‘फकाट’च्या ‘एलओसी सिक्रेट’चा धमाका

‘Unlock Zindagi’तील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss