Friday, March 29, 2024

Latest Posts

Vat Pornima 2023: केळी पासून बनवा हा उपवासाचा पदार्थ; जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

वटपौर्णिमा हा सण विवाहित बायका अगदी मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. या दिवशी सर्व महिला या वडाच्या झाडाची पूजा करतात.

वटपौर्णिमा हा सण विवाहित बायका अगदी मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. या दिवशी सर्व महिला या वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी उपवासाला फार महत्व असते. यादिवशी सर्व महिला आपल्या पतीसाठी त्याच्या उत्तम व दीर्घकालीन आयुष्यासाठी उपवास करतात. यादिवशी प्रत्येक घरी उपवासाचे विविध पदार्थ केले जातात. मात्र बहुतेकांच्या घरी साबुदाण्याचे पदार्थ केले जातात. उपवास म्हंटल की साबुदाणाच आठवतो. परंतु काही वेळेस हे साबुदाण्याचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. प्रत्येक उपवासाला आपण इतर अनेक चविष्ट पदार्थ बनवून खाऊ शकतो. तर आज आम्ही तुम्हाला केळीपासून बनवलेल्या रायत्याची रेसिपी सांगणार आहोत. केळी पासून आपल्या शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. केळी हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. केळ्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्वे, फायबर तसेच खनिजे यांचे प्रमाण अधिक असते, ते आपल्या आरोग्यासाठी भरपूर लाभदायक असते. चला तर मग जाणून घेऊया केळीचा रायता बनवतात तरी कसा?

केळीचा रायता बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

पिकलेली केळी – ३
वाळलेले बारीक खोबरे – १/२ कप
लिंबू – १
साधे दही – १ डब्बा
बारीक कापलेले बदाम (आवश्यकतेनुसार)

केळीचा रायता बनविण्यासाठीची कृती

केळीचा रायता बनविण्यासाठी सर्वप्रथम एक भांडे घेऊन ते गॅसवर पेटवून त्यामध्ये वाळलेले बारीक खोबरे कोरडे होऊपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर केळ्यांचे काप करा आणि त्यांना लिंबाचा रस व्यवस्थित लावा असे केल्याने केळी काळी पडणार नाही. त्यानंतर एक बाउल घेऊन त्यामध्ये केळींचे कापे टाका आणि त्याचबरोबर त्यामध्ये दही, खोबरे आणि बदाम टाकून व्यवस्थत एकत्र करून घ्या चांगल्याप्रकारे त्याचे मिश्रण करून घ्या. तुम्हाला जर हा रायता थंड हवा असेल तर काही वेळ तुम्ही त्याला फ्रिजमध्ये ठेवून नंतर खाऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही या रायत्या मध्ये साखर टाकू शकता. अशाप्रकारे तुमचा उपवासासाठी बनविलेला केळीचा रायता तयार होईल.

हे ही वाचा:

पुढच्या आठवड्यापर्यंत येणार मान्सून केरळमध्ये; मुख्यमंत्रांकडून आढावा बैठकांना सुरवात

इरफान खानचा मुलगा बाबिलनं ‘आयफा 2023’ पुरस्कारावर कोरलं नाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss