Friday, April 19, 2024

Latest Posts

Vat Pournima 2023, वटपौर्णिमेनिमित्त उपवासासाठी बनवा ‘हा’ खास पदार्थ

वटपौर्णिमा ही काही दिवसांवर आली आहे. जेष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी होणारी वटपौर्णिमा ही विवाहित स्त्रिया अगदी उत्साहात साजरी करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया वट सावित्रीचे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.

वटपौर्णिमा ही काही दिवसांवर आली आहे. जेष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी होणारी वटपौर्णिमा ही विवाहित स्त्रिया अगदी उत्साहात साजरी करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया वट सावित्रीचे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार वट सावित्रीचे व्रत केल्याने आपल्या पतीला उत्तम आयुष्य लाभते शिवाय वैवाहिक जीवन सुखी होते. आपल्याला सात जन्म हाच नवरा मिळूदे अशी प्रार्थना स्त्रिया करतात. या दिवशी उपवासाला अधिक महत्व असते. अनेकस्त्रिया या दिवशी उपवास करतात. उपवासाच्या दिवशी काय करावे हा सगळ्याच स्त्रियांना पडलेला प्रश्न असतो. नेहमीच उपवासाला साबुदाण्याचे पदार्थ खाऊन काही वेळेस कंटाळा येतो. मग यावर्षी नवीन काय बनवायचे असा प्रश्न बहुतांश स्त्रियांना पडलेलाच असतो. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी उपवासाचा एक पदार्थ घेऊन आलो आहोत तो म्हणजे रताळ्याचा शिरा. रताळ्याचा शिरा हा बनवायला देखील सोप्पं आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण रेसिपी.

रताळ्याचा शिरा बनविण्यासाठी लागणारे साहित्य

पावकिलो उकडून कुस्करलेली रताळी
पाऊण वाटी बारीक चिरलेला गूळ
पाव वाटी साजूक तूप
काप केलेला सुका मेवा

रताळ्याचा शिरा बनविण्यासाठीची कृती

सर्वात आधी रताळी स्वच्छ धुवून कुकरढे ७ ते ८ शिट्या काढून मऊ शिजवून घ्या. त्यानंतर रताळी थंड होण्यासाठी ठेवा. रताळी थंड झाली कि त्याची सालं काढून घ्या. काही रताळ्यांमध्ये असलेले केस काढून टाका. त्यानंतर रताळी चांगल्याप्रकारे कुस्करून घ्या. नंतर तुमच्याकडे असलेल एक भांड घ्या आणि गॅस पेटवून गॅस वर ठेवा आणि त्यात २ चमचे तूप टाका त्यानंतर त्यात कुस्करलेली रताळी टाकून चांगल्याप्रकारे परतवून घ्या. परतल्यावर त्यामध्ये गूळ घालून परत व्यवस्थित ढवळून घ्या. मध्ये मध्ये तूप टाकून व्यवस्थित ढवळा. सारखं परतल्यामुळे शिरा भांडायला चिकटणार नाही. शिरा काही वेळ शिजू द्यावा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यात ड्रायफ्रूट्स (Dryfruits) टाकू शकता. थोड्यावेळानी गॅस बंद करून शिरा तुम्ही सर्व्ह करू शकता. अशाप्रकारे तुमचा उपवासाचा रताळ्याचा शिरा तयार होईल.

हे ही वाचा : 

Important Days in June, हे आहेत जून महिन्यातील म्हत्वाचे दिवस, जाणून घ्या एका क्लिकवर

Nimrit Kaur Ahluwalia ट्रोलर्सवर भडकली, काय म्हणाली Nimrit

पगार हातात टिकत नाही? पैशांची बचत करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss