spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

आपण बाजरीची भाकरी नेहमी खातो; पण आता बाजरीच्या पिठाचे ‘चविष्ट’ आप्पे नक्की पहा करून…, जाणून घ्या खास रेसिपी

प्रकत्येक महिलेला नेहमी हाच प्रश्न पडलेला असतो की नाश्त्यासाठी वेगळे काय बनावे. जे हेल्दी आणि चविष्ट असेल. रोज रोज नाश्त्यासाठी काय करावं, मुलांना त्यांच्या डब्यासाठी काय द्यावं हे प्रश्न नेहमीच पडत असतात. कारण नेहमी तेच ते पदार्थ खाऊन आपल्या स्वतःला आणि घरातल्यानां देखील नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तेच पदार्थ नेहमी खायला आवडत नाही. पण जर चवीमध्ये बदल झाला तर सगळेच खुश होतात आणि पोट भर खातात. म्हणूनच तुम्ही नेहमीचा नाश्ता खाऊन कंटाळे असतील आणि आता तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीच्या शोधात असाल तर ही एक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अनेक लोकांना बाजरीची भाकर आवडत नाही. पण बाजरी ही खूप पौष्टिक असते आणि शरीरात उष्णता निर्माण करते. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये बाजरी आपल्या शरीरासाठी गुणकारक ठरते. यामुळे तुम्ही बाजरीची भाकरी एरवी नाही खाल्ली तरी थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून खा. म्हणूनच पौष्टिक बाजरी आपल्या घरातल्यांच्या पोटात जावी म्हणून तुम्ही बाजरीच्या पिठाचे आप्पे कसे करावे ते पाहा.

साहित्य :
१) बाजरीचे पीठ १ वाटी

२) रवा अर्धी वाटी

३) ताक आर्धी वाटी

४) बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या २

५) आलं -लसूण पेस्ट १ टेस्पून

६) मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा

७) बेकिंग सोडा छोटा चमचा

८) चवी नुसार मीठ

९) जिरे पूड १ चमचा

कृती :
सर्व प्रथम बाजरीच पीठ, ताक आणि रवा एकत्र करा. आता या मिश्रणात थोडे- थोडे पाणी टाकून भिजवून घ्या. तुम्ही डाळ, किंवा तांदळाचे आप्पे करताना जेवढं घट्टअसत, त्याच प्रमाणे हे ही पीठ भिजवावे. यानंतर भिजवलेल्या पिठामध्ये कांदा, चवीनुसार मीठ जिरे पूड, कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट आणि मिरची घालावे. हे सर्व एक जीव केल्यानंतर हे पीठ ५ ते १० मिनिटांसाठी झाकून ठेवा. यानंतर या पिठामध्ये बेकिंग सोडा थोड्याश्या पाण्यात कालवून घाला. हे पीठ पुन्हा एक जीव करा आणि, लगेच आप्पे पात्रामध्ये तेल लावून हे आप्पे बनवून घ्या, बाजरीच्या पिठाचे आप्पे हे नेहमी मध्यम आचेवर करून घ्यावे. आता तयार आहे बाजरीच्या पिठाचे चविष्ट आप्पे मंद आचेवर बनवलेले हे आप्पे खुशखुशीत होतात.

Latest Posts

Don't Miss