spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

रोज-रोज भाजीला काय करायचं ? प्रश्न पडलाय? मग ‘ही’ रेसिपी खास तुमच्यासाठी

नेहमीच सर्व गृहिणींना पडणारा प्रश्न म्हणजे भाजीला काय करायचे? रोज रोज त्याच भाज्या करून आणि खाऊन घरातल्या सर्वांना कंटाळा आलेला असतो. तर कधी कधी मुलांच्या डब्यासाठी नक्की काय बनवायचं असा प्रश्न पडतो. अशावेळी नवीन आणि झटपट तसेच चविष्ट, झणझणीत सुकी शेव भाजी नक्की ट्राय करता येईल.

नेहमीच सर्व गृहिणींना पडणारा प्रश्न म्हणजे भाजीला काय करायचे? रोज रोज त्याच भाज्या करून आणि खाऊन घरातल्या सर्वांना कंटाळा आलेला असतो. तर कधी कधी मुलांच्या डब्यासाठी नक्की काय बनवायचं असा प्रश्न पडतो. अशावेळी नवीन आणि झटपट तसेच चविष्ट, झणझणीत सुकी शेव भाजी नक्की ट्राय करता येईल. चला तर मग सुकी शेव भाजी कशी बनवायची याची सोपी रेसिपी पाहुयात.

सुकी शेव भाजी रेसिपी (Suki Shev Bhaji Recipe in Marathi)

साहित्य:

  • २ कप बारीक शेव
  • १ मोठा कांदा (बारीक चिरलेला)
  • १ टोमॅटो (बारीक चिरलेला)
  • १-२ हिरव्या मिरच्या (चिरून)
  • १/२ टीस्पून मोहरी
  • १/२ टीस्पून जिरं
  • १/२ टीस्पून हळद
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १ टीस्पून गरम मसाला
  • १ टीस्पून धने-जिरे पावडर
  • २-३ लसूण पाकळ्या (बारीक चिरून)
  • ५-६ कढीपत्ता पाने
  • २ टेबलस्पून तेल
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर (सजावटीसाठी)

कृती:

  •  कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाका.
  • त्यात चिरलेला कांदा आणि लसूण घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्या.
  • नंतर हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो घालून चांगले मऊ होईपर्यंत शिजवा.
  • हळद, लाल तिखट, धने-जिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
  • गॅस बंद करून शेव टाका आणि हलक्या हाताने मिक्स करा.
  • वरून कोथिंबीर टाकून लगेच सर्व्ह करा.

 टीप:

  • शेव ओलसर होऊ नये म्हणून शेव शेवटी टाकावी.
  • हवी असल्यास लिंबू रस घालू शकता.
  • पोळी किंवा भाकरीसोबत ही भाजी खूप चविष्ट लागते.
‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमदार Jitendra Awhad यांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss