spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद! तर घरच्या-घरी बनवा तंदूर रोटी

आता मुंबईतील कोळशावरील तंदूर भट्टी बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने यासाठी ११० हॉटेल्सला नोटीस पाठवली आहे. इलेक्ट्रिक एलपीजी, सीएनजी, पीएनजीचा वापर करावा असं या हॉटेल्सला बजावण्यात आले आहे. ०८ जुलै पर्यंत कोळसा भट्टी बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिकेकडून देण्यात आले आहेत. या आदेशांची अंमलबजावणी झाली नाही तर मात्र व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाबाबत ०९ जानेवारीला आदेश दिले होते की, मुंबई महानगरपालिका हद्दीमधील कोळसा, लाकूड किंवा इतर पारंपारिक इंधन वापरून म्हणजे कोळशाच्या तंदूर भट्टीचा वापर करून तंदुरी रोटी बनवणाऱ्या हॉटेल मालकांना आता त्यांच्या हॉटेलमध्ये बदल करावे लागणार आहेत. कोळशाच्या भट्टीऐवजी पीएनजी, एलपीजी, इलेक्ट्रिक, सीएनजी आणि इतर हरित ऊर्जा वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असं असताना तुम्ही आता घरच्या घरी तंदुरी रोटी बनवू शकता तर नक्की लिहून घ्या याची रेसिपी.

तंदुरी रोटी बनवण्याचे साहित्य
तंदुरी रोटी बनवण्यासाठी, तुम्हाला खालील घटकांची आवश्यकता असेल
२¼ कप संपूर्ण गव्हाचे पीठ (आटा)
½ टीस्पून मीठ
¼ टीस्पून बेकिंग सोडा
अर्धा कप साधे दही (ताजे, आंबट नाही)
१ टेबलस्पून तेल
अर्धा कप पाणी (+ आवश्यक असल्यास जास्त)
जर तुमचे दही आंबट असेल किंवा फक्त ग्रीक दही असेल तर १/४ कप दही १/४ कप दुधात मिसळा आणि वापरा.

तंदुरी रोटी बनवण्याची कृती
सर्वात पहिले आवश्यकतेनुसार थोडे तेल,मैदा,मीठ आणि पाणी मिसळून मऊसूत पीठ मळून घ्या. त्यानंतर या पिठाला थोडे तेल लावून कमीत कमी ३० मिनिटे बाजूला ठेवा जेणेकरून यीस्ट जास्त वर येण्याची शक्यता असते. ३० मिनिटांनंतर त्या कणकेचे गोळे बनवा. गोळे बनवताना लक्षात ठेवा की तंदूर रोटी नेहमीच्या चपातीपेक्षा मोठी असेल. त्यानंतर एक पॅन घ्या. तो पण जास्त गरम होऊ देऊ द्या. एका भांड्यात पाणी घ्या मग त्या पाण्यात थोडे मीठ मिसळा आणि बाजूला ठेवा. रोटी चांगली हाताने गोल करा आणि लाटण्याच्या साहाय्याने गुंडाळून किंवा हातांनी पसरवून घ्या.लक्षात ठेवा की तवा खूप गरम असेल तरचं रोटी चांगली शिजेल. तंदुरी रोटी जाड असते, म्हणून ती सामान्य रोटीपेक्षा जाडसर लाटून घ्या. मग बोटांच्या मदतीने रोटीच्या एका भागावर मिठाचं पाणी लावा आणि ते तव्यावर चिटकवा. ते तंदूरमध्ये चिटकतात तसेच तव्याला चिटकवा. रोटीला वरच्या बाजूने बोटांनी थोडेसे दाबा जेणेकरून ती तव्यावर फुगणार नाही काही बुडबुडे दिसू लागेपर्यंत रोटी अशीच ठेवा. यानंतर, तवा उलटा करा मग स्पॅटुलाच्या मदतीने पॅनमधून काढा. तंदुरी रोटी पॅन वरून काढल्याच्या नंतर त्यावर बटर लावा. तंदुरी पनीर भाजी सोबत सर्व्ह करा.

रोज-रोज भाजीला काय करायचं ? प्रश्न पडलाय? मग ‘ही’ रेसिपी खास तुमच्यासाठी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss