Winter Breakfast Recipe : नेहमी नाश्त्यात काय बनवायचं असा प्रश्न सर्व महिलांना पडतो आणि त्यात रोज रोज कांदे पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा येतो अश्यातच झटपट बनणार नाश्ता म्हणजे काकडी पोहे. काकडी मध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे तुम्ही झटपट असे काकडी पोहे नक्की ट्राय करा. काकडी पोहे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि त्याची कृती देखील जाणून घ्या.
काकडी पोहे बनविण्याचे साहित्य :
१ कप पोहे
अर्धा कप किसलेली काकडी
१/३ वाटी किसलेले खोबरे
१-२ टिस्पून तेल
१ टिस्पून चना डाळ
१ टिस्पून उडीद डाळ
२० ग्रॅम शेंगदाणे
१ टिस्पून चिरलेले आले
बारीक चिरलेली हिरवी मिरची
कोथिंबीर (चिरलेली)
कढीपत्ता
मीठ चवीनुसार
तेल
काकडी पोहे बनवण्याची कृती :
काकडी पोहे बनवण्यासाठी १ कप पोहे घ्या. ते पोहे चांगले स्वच्छ धुवून घ्या. ते भिजलेले पोहे एक मोठ्या भांड्यात बाजूला काढून घ्या. त्या भिजलेल्या पोह्यांच्या कढईत किसलेली काकडी आणि त्याचसोबत किसलेले खोबरे घाला. ते मिश्रण चांगले हलक्या हाताने मिक्स करा. नंतर दुसऱ्या कढईत तेल गरम करा. तेल गरम झाले कि त्यात हिरवी मिरची, जिरे, मोहरी, हिंग, चना डाळ, उडीद डाळ,कढीपत्ता टाकून ते मिश्रण चांगले मिक्स करून घ्या मग त्यात भिजलेले पोहे आणि किसलेली काकडी घालून हे सगळे मिश्रण चांगले ढवळून घ्या. तुमच्या काकडी पोह्याला एक हलका, ताजगीपूर्ण चव मिळेल आणि ह्या चविष्ट व हेल्दी पदार्थाचा आनंद घ्या
हे ही वाचा:
छगन भुजबळ म्हणजेच ओबीसी समाज का? Suhas Kande यांचा भुजबळांवर हल्लाबोल
अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या कथित विधानानंतर संसद दणाणली; विरोधक आक्रमक