Saturday, April 20, 2024

Latest Posts

राशिभविष्य, १३ मे २०२३, आज आपल्यातील धाडसी स्वभावाचा…

आजच्या दिवशी उत्तम गृह सौख्याची प्राप्ती होईल.

माझी रास

मेष – आजच्या दिवशी उत्तम गृह सौख्याची प्राप्ती होईल. आज घरातील सर्वांची काळजी घ्याल. घरातील बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे आज झपाट्याने पूर्ण कराल.

वृषभ – आज आपल्यातील धाडसी स्वभावाचा, कर्तुत्वाचा व उत्साहाचा योग्य उपयोग करून जास्तीत जास्त लाभ करण्याचा प्रयत्न कराल. काही प्रवास योग संभवतात

मिथुन – आज पारिवारिक, कौटुंबिक सौख्याचा आनंद घ्याल. कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वेळ द्याल. कुटुंबीयांसमवेत त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा.

कर्क – आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय सुंदर व महत्त्वाचा असेल. काहीतरी नवीन गोष्टी करण्याकडे आज आपला ओढा राहील. नवीन ऊर्जा, उत्साह, उमेद यांनी परिपूर्ण असा दिवस असेल.

सिंह – आज काही गोष्टी मनाविरुद्ध घडण्याची शक्यता राहील. एक प्रकारचे नैराश्य जाणवेल. काही अनावश्यक खर्च देखील संभवतात. खर्चाचा योग्य ताळमेळ साधावा.

कन्या – आजचा आपला दिवस लाभ, यश,आनंदाची प्राप्ती करणारा असेल. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. मनातील सर्व इच्छांची पूर्तता होईल.

तुळ – आजचा संपूर्ण दिवस कार्यमग्न असाल. आपल्यातील बुद्धिमत्ता व व्यवहार कौशल्य यांचा योग्य वापर करत आज कार्यसिद्धी साधाल. कर्तव्यपूर्तीने समाधान प्राप्त होईल.

वृश्चिक – आजच्या दिवशी भाग्याची, सौख्याची, आनंदाची प्राप्ती कराल. आपल्यातील कलाकौशल्य, रसिकता, मधुरता यांचा योग्य ताळमेळ साधत मजेत दिवस घालवाल.

धनु – आजच्या दिवशी काहीसे मानसिक अस्थैर्य जाणवेल. अचानक काही अडचणी समोर येऊ शकतात. धीराने त्यांचा सामना करणे हितावह राहिलं.

मकर – आजच्या दिवशी वैवाहिक सुखाचा आस्वाद घ्याल. वैवाहिक जोडीदाराला मनासारखा वेळ द्याल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचे मत देखील विचारात घ्याल.

कुंभ – आजचा दिवस काहीसा कष्टप्रद राहू शकतो. काहीसे प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. काही गोष्टी मनाविरुद्ध घडण्याच्या शक्यता राहतील.

मीन – आज आपल्या बुद्धिचातुर्याने दिवस आनंदात, मजेत व्यतीत कराल. एक नावीन्यपूर्ण उत्साह व उमेद आज आपल्यात असेल. संतती सौख्य देखील उत्तम लाभेल.

हे ही वाचा:

सनस्क्रीनचा उपयोग केसांनाही होतो …… जाणून घ्या फायदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss