Tuesday, June 6, 2023

Latest Posts

राशिभविष्य ,१७ मे २०२३, बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आजचा उत्तम दिवस आलेला आहे.

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आजचा उत्तम दिवस आलेला आहे. त्याचा अवश्य लाभ करून घ्या. आजच्या एका दिवसाचे विविध पैलू आपण अनुभवाल. जोडीदाराचे देखील सहकार्य लाभेल.

माझी रास

मेष – बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आजचा उत्तम दिवस आलेला आहे. त्याचा अवश्य लाभ करून घ्या. आजच्या एका दिवसाचे विविध पैलू आपण अनुभवाल. जोडीदाराचे देखील सहकार्य लाभेल.

वृषभ – आज शारीरिक, मानसिक अस्थिरता जाणवेल. काहीसे नैराश्य, औदासिन्य वाटेल. आजच्या दिवशी कोणतेही अनाठाई धाडस करू नका. आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.

मिथुन – आजचा आपला दिवस लाभप्राप्ती, इच्छापूर्तीचा आहे. इतक्या दिवसांच्या मेहनतीचे शुभ फळ आज मिळेल. त्यामुळे कृतकृत्य वाटेल. अधिकारी, सहकारी वर्गाची प्रशंसा प्राप्त कराल.

कर्क – आजचा आपला दिवस कर्मप्रधान, कर्तव्य प्रधान असेल. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केवळ आपल्या कर्तव्यपूर्ती कडे लक्ष द्या. कर्तव्यपूर्तीतून आनंदाची व लाभाची प्राप्ती कराल.

सिंह – आजच्या दिवशी आपणास अपेक्षित आनंदाची, सौख्याची प्राप्ती होईल. आज आपण उत्तम फलिते मिळण्याचे अधिकारी आहात. त्यामुळे नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. इतरांना आनंद, सुख, समाधान देऊन आपला आनंद द्विगुणीत कराल.

कन्या – आजचा दिवस काहीसा अडचणींनीयुक्त जाऊ शकतो. आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. आजच्या दिवशी नको त्या कामात वेळ वाया घालवू नका.

तुळ – आज जोडीदाराला वेळ द्या. जोडीदाराच्या भावना, इच्छा-आकांक्षा समजून घ्या. जोडीदाराच्या मतांचा सन्मान करा. वैवाहिक जीवनात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.

वृश्चिक – आजचा दिवस काहीसा खडतर, कष्टप्रद जाऊ शकतो. काही अनपेक्षित प्रसंग सामोरे येतील. प्रकृतीच्या काही चिंता सतावतील. आज कोणावरही विश्वास ठेवू नका. कोणाचीही अपेक्षित साथ मिळणार नाही.

धनु – आजचा दिवस मनोइप्सित इच्छाप्राप्तीचा लाभ होईल. आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून मार्गक्रमण कराल. आज संततीचे यश, त्यांचे भवितव्य यावर लक्ष द्याल. काही महत्त्वाची कामे हातावेगळी कराल.

मकर – आजचा आपला दिवस सौख्यप्राप्तीचा असेल. मनातील काही इच्छा, अपेक्षा आज पूर्ण होतील. आज आपल्याला शक्य होतील, झेपतील एवढीच कामे हाती घ्या. विनाकारण जास्त कामे करण्यास जाऊ नका.

कुंभ – आज आपल्यातील क्षमतांचा योग्य वापर करून काही धाडसी निर्णय घ्याल. विशिष्ट पदाची प्राप्ती कराल. आज आज आपल्या कामाप्रती देखील दक्ष असाल. व्यवसाय वृद्धी संदर्भात काही ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्याल.

मीन – आजचा आपला दिवस कुटुंबीयांसमवेत आनंदाने व्यतीत कराल. कुटुंबीयांच्या इच्छा, त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. परिवारातील सदस्यांचा विश्वास संपादन कराल. त्यांच्या सहकार्याने काही महत्त्वाचे निर्णय देखील घ्याल.

माऊली जोतिष कार्यालय.
पं केतन पाठक गुरुजी
९८९२४१३८६०

Latest Posts

Don't Miss