Saturday, June 3, 2023

Latest Posts

राशिभविष्य, १९ मे २०२३, आजचा दिवस…….

आज कुटुंबातील सदस्यांशी सामंजस्याची भूमिका ठेवून वागण्याचा प्रयत्न करा. आपले निर्णय त्यांच्यावर लादू नका

माझी रास

मेष – आज कुटुंबातील सदस्यांशी सामंजस्याची भूमिका ठेवून वागण्याचा प्रयत्न करा. आपले निर्णय त्यांच्यावर लादू नका. आपलेपणाची भावना ठेवून वागावे.

वृषभ – आजचा दिवस आपणासाठी उत्तम असणार आहे सर्व गोष्टी मनाजोगत्या घडतील. जोडीदाराची उत्तम साथ व पाठबळ लाभेल. कुटुंबीयांचेही सहकार्य मिळेल.

मिथुन – आज मनाची काहीशी द्विधा अवस्था असू शकते. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे व्यवहार विचारपूर्वक करा. आपल्या कामाचे अपेक्षित चीज आज होणार नाही.

कर्क – बऱ्याच दिवसांपासून घेत असलेल्या मेहनतीचे फळ आज आपणास प्राप्त होईल. आपली योग्यता, पात्रता आज सिद्ध होईल. आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.

सिंह – आज आपणास भाग्याची साथ लाभेल. मात्र नियोजनपूर्वक काम करण्यावर भर द्या. शांतपणे आपल्या कामाची आखणी करा व त्यानुसार कृती करा.

कन्या – आज आपली बुद्धिमत्ता व कलात्मकता यांचा योग्य वापर करून भाग्याची प्राप्ती कराल. आपले इच्छित ध्येय गाठण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा राहील.

तुळ – आजचा दिवस काहीसा चिंतायुक्त, तणावग्रस्त जाण्याची शक्यता राहील. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. कोणावरही अतिविश्वास घातक ठरू शकतो.

वृश्चिक – आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराशी मतभिन्नता होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराच्या भावना, त्याच्या मतांचा आदर करा.

धनु – आजचा दिवस आपणासाठी कष्टप्रद असेल. मानसिक, शारीरिक अस्थैर्य जाणवेल. आरोग्याच्याही काही चिंता सतावतील. मन विचलित न होऊ देता आजचा दिवस व्यतीत करणे फायद्याचे राहील.

मकर – आजचा दिवस उत्साहाने, आनंदाने परिपूर्ण असेल. आपल्या आवडीनिवडी, छंद जोपासण्यासाठी आज वेळ काढाल आजच्या दिवसाचा सदुपयोग करावा.

कुंभ – आजच्या दिवशी गृहसौख्याचा, कुटुंब सौख्याचा आस्वाद घ्याल. आज घरच्यांसोबत मजेत दिवस व्यतीत कराल. घरातील ज्येष्ठांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त कराल.

मीन – आज कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेताना त्यावर सारासार विचार करणे आवश्यक राहील. आज काही छोटे-मोठे प्रवास संभवतात. त्यात काळजी घेणे आवश्यक राहील.

माऊली जोतिष कार्यालय.
पं केतन पाठक गुरुजी
९८९२४१३८६०

Latest Posts

Don't Miss