Monday, June 5, 2023

Latest Posts

राशिभविष्य, १८ मे २०२३, आज जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य मिळेल.

आजच्या दिवशी सुखी, आनंदी सहजीवनाचा अनुभव घ्याल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. आपणही जोडीदाराला उत्तम साथ द्याल.

माझी रास

मेष – आज जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य मिळेल. व्यवसायिक यशाची प्राप्ती होईल. त्यामुळे आजचा दिवस उत्साह, आनंद, प्रसन्नता यांनी परिपूर्ण असा जाईल.

वृषभ – आज शारीरिक-मानसिक अस्थिरता जाणवेल. काही अप्रिय घटनांमुळे त्यात भरच पडू शकते. त्यामुळे मन व चित्त शांत ठेवून आजचा दिवस व्यतीत करावा.

मिथुन – इतके दिवस घेत असलेल्या मेहनतीचे, परिश्रमाचे शुभ फलित आज आपणास प्राप्त होईल. आज आपल्या मनोइप्सित इच्छा,आकांक्षांची पूर्तता होईल.

कर्क – आजचा आपला दिवस कर्म प्रधान असेल. आज आपले काम अधिक चोखपणे, प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न कराल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

सिंह – आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम असेल. भाग्याची, नशिबाची साथ आज आपणास लाभेल. त्यामुळे आनंदून जाल. आपल्या सुखात इतरांनाही सहभागी करून घ्याल.

कन्या – आज काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे व्यर्थ कामांमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. आपले लक्ष व चित्त विचलित न होऊ देता केवळ आपल्या नित्य कामावर लक्ष केंद्रित करा.

तुळ – आजच्या दिवशी सुखी, आनंदी सहजीवनाचा अनुभव घ्याल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. आपणही जोडीदाराला उत्तम साथ द्याल.

वृश्चिक – आज काही अप्रिय घटना वा प्रसंग यांना सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे तशी मानसिकता ठेवा. कोणाच्याही सहकार्याची फारशी अपेक्षा ठेवू नका.

धनु – आजचा आपला दिवस उत्साहवर्धक असेल. आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्नशील राहाल. काही महत्त्वाची कामे हातावेगळी कराल.

मकर – आजचा दिवस घरातील खूप दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यात जाईल. घरातील सजावटीसाठी काही नवीन वस्तूंची खरेदी देखील संभवते.

कुंभ – आज व्यवसायवृद्धिचा विचार करून आपल्या कार्यक्षेत्रात काही धाडसी निर्णय घ्याल. मात्र त्यासाठी ज्येष्ठ, अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन अवश्य घ्या.

मीन – आजच्या दिवशी कुटुंबीयांसमवेत रममाण व्हाल. कुटुंबीयांना आज त्यांच्या मनाजोगता वेळ द्याल. आज काही आर्थिक व्यवहार देखील पूर्ण कराल.

माऊली जोतिष कार्यालय.
पं केतन पाठक गुरुजी
९८९२४१३८६०

Latest Posts

Don't Miss