Friday, June 2, 2023

Latest Posts

राशिभविष्य, ७ मे २०२३, आज उत्तम वैवाहिक सौख्याची प्राप्ती होईल

माझी रास

मेष – आज उत्तम वैवाहिक सौख्याची प्राप्ती होईल. दाम्पत्य जीवनातील मधुरता,प्रेम वृद्धिंगत होईल. आवडत्या कार्यक्षेत्रात काही नवीन संधी उपलब्ध होतील.

वृषभ – आज काहीसे शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याच्या छोट्यामोठ्या तक्रारी सतावतील. उधार उसनवारी टाळा. हितशत्रूंच्या कारवायांना म्हणून पाडाल.

मिथुन – आज आपल्या कार्यक्षेत्रात काही नवीन संधी निर्माण होतील. कलाक्षेत्रातील मंडळींसाठी उत्तम दिवस राहील. काही प्रिय व्यक्तींच्या सहवासाने सुखावून जाल.

कर्क – आज उत्तम गृह सौख्याची, समाधानाची प्राप्ती कराल. कुटुंब, परिवारात सुवार्ता येतील. परिवार, कुटुंबाप्रती आपले कर्तव्य बजावाल.
ज्येष्ठांचे आशीर्वाद प्राप्त कराल.

सिंह – आज काही नवे नियोजन उत्साहात करून त्याप्रमाणे कार्यास प्रारंभ कराल. नवनवीन संकल्पना तसेच नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यावसायिक बदल घडवून आणाल.

कन्या – आज कौटुंबिक वातावरण समाधानी,आनंदी व उत्साहवर्धक राहील. कुटुंबीयांसमवेत काही धार्मिक कार्यात मग्न राहाल. काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहारही पार पाडाल.

तुळ – आजचा दिवस आपणासाठी नवचैतन्याचा व उत्साहवर्धक असेल. आपल्या कलाकृतीचे कौतुक होईल. आज स्वतःसाठी देखील वेळ काढाल.

वृश्चिक – आजचा दिवस काहीसा चिंता, भीती यांनी युक्त जाऊ शकतो. विनाकारण मनावर दडपण येईल. परंतु व्यर्थ चिंता न करता केवळ नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करा.

धनु – आज उत्तम लाभप्राप्ती, इच्छाप्राप्ती संभवते. आज बऱ्याच गोष्टी आपल्या मनाजोगत्या घडतील. जुन्या मित्र-मैत्रिणींशी वार्तालाप संभवतो.

मकर – आज कामाच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. जास्तीचे काम करावे लागल्यामुळे काहीशी दगदग संभवते. मात्र चांगल्या कामाची शाबासकी देखील मिळेल.

कुंभ – आजच्या दिवशी काही धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यात सक्रिय राहाल. त्यामुळे कौतुकास, प्रशंसेस पात्र ठराल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मीन – आजचा दिवस काहीसा प्रतिकूल असेल. त्यामुळे वाद-विवादांपासून अलिप्त राहा. कोणत्याही परिस्थितीत आपले मनोधैर्य खचणार नाही याची काळजी घ्या.

माऊली जोतिष कार्यालय.
पं केतन पाठक गुरुजी
९८९२४१३८६०

Latest Posts

Don't Miss