Monday, June 5, 2023

Latest Posts

राशिभविष्य, ११ मे २०२३, आजचा आपला दिवस…

आजचा दिवस आपणासाठी सौख्याने परिपूर्ण असेल.

माझी रास

मेष
आजचा दिवस आपणासाठी सौख्याने परिपूर्ण असेल. उत्तम गृहसौख्य, वास्तू, वाहनसौख्य लाभेल. आज गृहसजावटीकडे लक्ष द्याल. आज घरातील आपला वावर घरातील वातावरण चैतन्यमय करून टाकेल.

वृषभ
आजचा आपला दिवस पराक्रमाचा, शौर्याचा, धाडसाचा असेल. आपली मेहनत, परिश्रम, कष्ट यांच्या बळावर आज आपण लाभ प्राप्ती करून घ्याल.

मिथुन
आज आपण कुटूंबियांना प्राधान्य देणार. कौटूंबिक सौख्याचा आस्वाद आज आपण घ्याल. त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो.

कर्क
आजचा दिवस आपलाच आहे. आज आपण नवचैतन्य, अपूर्व उत्साह यांचा अनुभव घ्याल. आज स्वत:साठी वेळ काढाल. आपल्या आनंदात जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

सिंह
आजचा आपला दिवस काहीसा कष्टप्रद असेल. अचानकपणे खर्च उद्भवतील. आरोग्यही प्रतिकूल राहील. खर्चाचा योग्य ताळमेळ आज बांधावा लागेल.

कन्या
आजचा आपला दिवस लाभप्राप्ती व इच्छापूर्तीचा आहे. इतके दिवस केलेल्या मेहनतीचे फळ आज आपणास मिळेल. प्रकृतीची मात्र योग्य काळजी घ्या.

तुळ
आजचा आपला दिवस कर्मप्रधान असेल. आज आपण कर्तव्यपूर्तीला जास्त प्राधान्य द्याल. अनेक दिवसांपासून रखडलेली सरकारी कामे आज मार्गी लागतील.

वृश्चिक
आजचा आपला दिवस भाग्य, यश, आनंदप्राप्तीचा आहे. आज प्रवासाचे योग संभवतात. अनोळखी व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील.

धनु
आजचा दिवस खडतर, चिंतायुक्त व तणावग्रस्त असेल. कौटुंबिक समस्या सतावतील. आज फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. उगाच कोणाशी वाद होतील, असे प्रसंग टाळावेत.

मकर
आजचा दिवस आपल्यासाठी अपूर्व उत्साहाचा असेल. आज उत्तम वैवाहिक सुखाची अनुभूती घ्याल. जोडीदाराला भरभरून प्रेम द्याल. जोडीदाराचेही उत्तम सहकार्य लाभेल.

कुंभ
आजचा आपला दिवस काहीसा अस्वस्थ, मनस्तापदर्शक असू शकतो. आज प्रकृती अशक्त जाणवून आरोग्याच्या तक्रारी सतावतील. योग्य वेळी योग्य उपचार करून घेणे हिताचे राहील.

मीन
आज उत्तम संतती सौख्य लाभेल. संततीचे शिक्षण त्यांचे आरोग्य करिअर त्यांची स्वप्ने याविषयी सजग राहा. आजचा दिवस समाधानी खेळीमेळीचा राहील

Latest Posts

Don't Miss