spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

आजचे राशिभविष्य, ३ जून २०२३, आजचा दिवस काहीसा चिंता…

आज आपल्या कर्तुत्वाला एक वेगळीच झळाळी प्राप्त होईल.

माझी रास

मेष
आज आपल्या कर्तुत्वाला एक वेगळीच झळाळी प्राप्त होईल. आपल्या मूळ धडाकेबाज स्वभावानुसार आज काहीतरी नवीन धाडस करण्याकडे कल असेल. त्यातूनच भाग्याची, सौख्याची प्राप्ती कराल.

वृषभ
आजचा दिवस काहीसा चिंता युक्त जाऊ शकतो कुटुंबातही काही तणाव जाणवेल. वाहने चालविताना सावधगिरी बाळगावी. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

मिथुन
आज स्वतः सोबतच जोडीदाराला देखील वेळ द्याल. जोडीदाराच्या भावना समजून घ्याल. व्यापार व्यावसायिकांना काही नवीन संधी प्राप्त होतील.

कर्क
आज प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे राहील काही स्पर्धक, हितशत्रू कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतील. संयम व शांततेने त्यांचा सामना करा.

सिंह
आजचा दिवस उत्साहाने, आनंदात, मजेत व्यतीत कराल. जीवनसाथी बरोबर छान हितगुज साधाल. आज मुलांनादेखील वेळ द्याल. त्यांच्या आनंदात समरस होऊन जाल.

कन्या
आज घरातील वातावरण आनंदी, प्रसन्न, सौख्यपूर्ण असेल. घरातील बरेच दिवसांपासून दुर्लक्षित राहिलेले काही कामे आज पूर्ण कराल. माहेरच्या मंडळींच्या गाठीभेटी होतील.

तुळ
आजची आपली मानसिकताही परिश्रमातून, मेहनतीतून आनंद प्राप्त करण्याची असेल आजचा संपूर्ण दिवस निरनिराळ्या योजनांवर आखणी व अंमलबजावणी करण्यात जाईल.

वृश्चिक
आजच्या दिवशी कौटुंबीक सुखाची प्राप्ती कराल. घरातील मंडळींसमवेत आनंदात दिवस व्यतीत कराल. आज काही आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल.

धनु
आजचा दिवस आपणासाठी अतिशय उत्तम असेल. एकाच दिवसाचे विविध पैलू आज आपणास अनुभवायला मिळतील. योग्य नियोजन, योग्य निर्णय व त्यानुसार योग्य कृती करणे आवश्यक असेल.

मकर
आजचा दिवस काहीसा ताण-तणाव युक्त असेल. आज विविध विवंचना, प्रश्न त्रास देतील. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य डळमळीत होईल. संयम व धीराने आजचा दिवस व्यतीत करा.

कुंभ
आजचा दिवस इच्छापूर्ती, अपेक्षापूर्तीचा आहे. बऱ्याच दिवसांपासून घेत असलेल्या कष्टांची शुभ फलिते आज प्राप्त होतील. आज वाहवा, प्रशंसा, कौतुक यास पात्र व्हाल.

मीन
आज संपूर्ण दिवस कामात व्यस्त असाल. कामाचा अतिरिक्त तणाव जाणवेल. वरिष्ठ सहकारी यांची मर्जी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल.

माऊली ज्योतिष कार्यालय
पं केतन पाठक गुरुजी
९८९२४१३८६०

Latest Posts

Don't Miss