spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

ताप आल्यावर अंघोळ करणे योग्य कि अयोग्य? जाणुन घ्या

सध्याच्या बदलेल्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास होण हे सामान्य आहे. या बदलत्या हवामानात संसर्गजन्य (Infectious) ताप खूप जास्त राहतो. अश्यावेळी तुम्ही स्वतःचे संरक्षण करणे आणि स्वत:ची काळजी घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

सध्याच्या बदलेल्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास होण हे सामान्य आहे. या बदलत्या हवामानात संसर्गजन्य (Infectious) ताप खूप जास्त राहतो. अश्यावेळी तुम्ही स्वतःचे संरक्षण करणे आणि स्वत:ची काळजी घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. तुमची प्रतिकारशक्ती मजबूत राहिल्यास तुम्हाला व्हायरल (Viral) आजार हे जडणार नाहीत. तर बदलत्या हवामानामुळे होणारे आजार टाळायचे कसे? हा आता सर्वात मोठा प्रश्न असतो. ताप टाळण्यासाठी काय करावे? ताप आल्यावर आंघोळ करावी की नाही? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. चला तर मग जाणुन घेऊया.

ताप सारखा का येतो? (Why does it feel like a fever?)
पावसाळ्यात संसर्गजन्य तापाची प्रकरणे ही दुप्पट वेगाने वाढू लागतात. एखाद्या व्यक्तीला ताप आल्यास दुसऱ्या व्यक्तीला ही त्याची लागण होऊ शकते. कधी एखाद्याला ताप आला तर तो ठराविक कालावधीनंतर तो सतत येत राहतो. ज्याची प्रतिकारशक्ती ही खूप कमकुवत असते, अशा व्यक्तीला वारंवार संसर्गजन्य तापाचा धोका असतो. हे विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध लोकांना सतत ताप लक्षणे दिसून येतात. थंड वातावरणामुळे ही सतत ताप येत राहतो.

ताप आला असताना अंघोळ करावी की नाही? (Should you take a bath when you have a fever or not?)
आपल्याला नेहमी हा प्रश्न पडतो की, संसर्गजन्य ताप असताना आंघोळ करायला हवी की नाही. तर जेव्हा तुम्हाला व्हायरल फिव्हर (Viral fever) येतो, त्यावेळी स्वच्छतेची विशेष काळजी ही घेतली पाहिजे. तुम्ही जितके स्वच्छ असाल तितक्या लवकर तुम्हाला बरे वाटेल. तुम्हाला जर व्हायरल फिव्हर असेल तर तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ केली पाहिजे. आंघोळ केल्यास तुम्हाला अधिक ताजेतवाने वाटेल.

ताप असताना घरी बसून औषध घेणे योग्य की अयोग्य? (Is it right or wrong to take medicine while having fever?)
व्हायरल ताप आल्यास घरी बसून मेडिकलमधून औषधे आणून घेऊ नये. तर एकदा डॉक्टरांकडे देखील जाऊन यावे. डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा. स्वत:च मेडिकलमधून गोळ्या आणून बरे होण्याचा प्रयत्न केल्यास ताप हा बराच काळ राहू शकतो. ताप लवकर जाण्यासाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही गरम पाणी, आल्याचा चहा आणि काढा ही पिऊ शकता आणि वाफ घेऊ शकता. या घरगुती उपायांनी तुम्हाला बरे वाटेल. पण त्यामुळे ताप कमी होणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला चांगल्या उपचारांची गरज असते. त्यामुळे स्वत:वर उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे हे आवश्यक आहे.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा:

भाजीतले जास्तीचे तेल काढण्याच्या ३ सोप्या टीप्स

Ganeshotsav 2023, गॅस ही न पेटवता करा झटपट इंस्टंस्ट Kaju Katali Modak

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss