New Year 2025 Calendar : दरवर्षी सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असे सण समीकरण ठरलेले असते. अश्यातच हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मोहरम आणि आषाढी हे सण एकाच दिवशी येणार आहेत. हे सण ६ जुलैला एकाच दिवशी आहेत.
नव्या वर्षाची सुरुवात आता काही दिवसातच होणार आहे. दिनदर्शिकेनुसार कोणत्या तारखेला कोणते सण येणार याकडे लक्ष लागून राहिलेले असते. विशेष म्हणजे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी असे मोठे सण कोणत्या महिन्यात येतात, हे लोक आवर्जून दिनदर्शिकेत पाहतात. २०२५ च्या नव्या वर्षात सण १० ते १२ दिवस आधीच येत आहेत. यंदा ऑगस्ट महिन्यात गणपतीबाप्पाची आगमन होणार आहे.दरवर्षी सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असे सण समीकरण ठरलेले असते. अधिक महिना असल्याकारणाने सण एक महिना पुढे जातात. यंदा मात्र १ ते १५ दिवस आधीच सर्व सण उत्साहात साजरे होणार आहेत. येत्या वर्षाची सुरुवात मकर संक्रातीने होणार आहे. १४ जानेवारीला मकर संक्रांत आहे. गुढीपाडवाही मार्चमध्येच साजरा होणार आहे.
आषाढी एकादशी व मोहरम एकाच दिवशी
2025 मध्ये आषाढी एकादशी आणि मोहरम (इस्लामी नवीन वर्ष) एकाच दिवशी ६ जुलै 2025 रोजी येत आहेत. हे एक असामान्य आणि विशेष योग आहे कारण दोन्ही धार्मिक सण वेगवेगळ्या परंपरांचे पालन करणारे असतात. गुढीपाडवा आणि रमजान ईदही लागोपाठ असून ३० मार्चला गुढीपाडवा तर ३१ मार्चला रमजान ईद साजरी होईल.
२०२५ मध्ये सण कोणत्या तारखेला येत आहेत
भोगी (१३ जानेवारी) सोमवार
मकर संक्रांत (१४ जानेवारी) मंगळवार
महाशिवरात्री (२६ फेब्रुवारी) बुधूवार
होळी (१३मार्च) गुरुवार
रंगपंचमी (१९मार्च) बुधूवार
गुढीपाडवा (३०मार्च) रविवार
वटपौर्णिमा (१०जून) मंगळवार
कर्नाटकी बेंदूर (१२जून) गुरुवार
आषाढी एकादशी (६जुलै) रविवार
श्रावण महिना प्रारंभ (२५जुलै) शनिवार
नागपंचमी (२९जुलै) मंगळवार
रक्षाबंधन (९ऑगस्ट) शनिवार
श्रीकृष्ण जन्मष्टमी (१५ऑगस्ट) शुक्रवार
श्री गणेश चतुर्थी (गणेश आगमन २७ऑगस्ट) बुधवार
गौरी आगमन (३१ऑगस्ट) रविवार
गौरी पूजन (१सप्टेंबर) सोमवार
घरगुती गणेश विसर्जन (२सप्टेंबर) मंगळवार
अनंत चतुर्दशी (६सप्टेंबर) शनिवार
घटस्थापना (२२सप्टेंबर) सोमवार
दसरा (२ऑक्टोबर) गुरुवार
नरक चतुर्दशी (दीपावली) (२०ऑक्टोबर) सोमवार
लक्ष्मी पूजन (२१ऑक्टोबर) मंगळवार
दिवाळी पाडवा (२२ऑक्टोबर) गुरुवार
भाऊबीज (२३ऑक्टोबर) गुरुवार
तुलसी विवाह (२ऑक्टोबर) रविवार
दत्त जयंती (४डिसेंबर) गुरुवार