सकाळी उठल्यावर तुमचे पोट स्वच्छ असेल तर तुम्हाला दिवसभर चांगले वाटते आणि पचन देखील सुरळीत होते. ‘ पोट बरोबर असेल तर सगळं बरोबर ‘ असं म्हटलं जातं. रोज सकाळी गरम पाणी पिणे आयोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. त्या सोबतच बद्धकोष्ठतेची(Constipation) समस्या देखील दूर होतात. गरम पाणी आतड्याची क्रियाशीलता वाढवते. तसेच गरम पाण्यात असलेली उष्णता ही वजन कमी करण्यास मदत करते. गरम पाणी शरीराला हायड्रेट(Hydrate) ठेवते. आपला थकवा दूर करते आणि ऊर्जा वाढवते. हे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. नियमित गरम पाणी प्यायल्याने तणाव देखील कमी होतो. चला तर मग गरम पाण्याचे फायदे काय हे जाणून घ्या.
पचनक्रिया सुधारते (Improves digestion) – गरम पाण्याने पचनक्रिया सुधारते. पोटातील गॅसची समस्या देखील कमी होते. जेव्हा आपण कोमट पाणी पितो. तेव्हा ते आपल्या पोटाचे आणि आतड्याच्या स्नायूंना आराम देते, त्यांना अधिक सक्रिय आणि लवचिक बनवते. परिणामी, अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि गॅस आणि पचनाशी इतर समस्या दूर होण्याची शक्यता असते. जिरे किंवा अजवाईन सारख्या पाचन औषधी गरम पाण्यात टाकल्यास पचनशक्ती खूप सुधारते. त्यामुळे पचनाशी संबंधित इतर समस्या असल्यास, गरम पाण्याचे नियमित सेवन केल्याने आराम मिळेल.
डिटॉक्सिफिकेशन (Detoxification) – गरम पाण्याचे सेवन केल्याने डिटॉक्सिफिकेशनमध्ये, म्हणजे शरीराच्या अवांछित(Unwanted) आणि हानिकारक पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. जेव्हा आपण जास्त पाणी पितो तेव्हा ते आपल्या मूत्रपिंडांना अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास मदत करते. गरम पाण्याचे आपल्या शरीरातील अतिरिक्त क्षार सहजपणे बाहेर टाकले जातात. .
आरामदायी प्रभाव(Relaxing effect) – गरम पाण्याचे सेवन केल्याने आपला तणाव, चिंता आणि मानसिक थकवा दूर होतो. गरम पाण्याची मंद आणि सुखदायक उबदारपणा जीवनातील गुंतागुंत आणि चिंतापासून सुटका देते आणि आपल्याला आनंद आणि विश्रांतीची आंतरिक भावना मिळते.
स्नायूना आराम मिळतो(Muscles relax) – कोमट पाणी स्नायूंना आराम येतो, ज्यामुळे वेदना आणि कडकपणा दूर होतो. कोमट पाण्याचे सेवन केल्याने स्नायूंना आराम मिळतो. आपण शारीरिक व्यायाम किंवा किंवा शारिरीक कामानंतर थकतो तेव्हा आपले स्नायू जड होतात , अश्या वेळी गरम पाणी प्यायल्याने स्नायूंना उष्णता मिळते. त्यामुळे त्यांना आराम मिळतो आणि तणाव दूर होतो.
त्वचा सुधारते(Improves skin) – गरम पाणी प्यायल्याने त्वचा शरिराच्या आतून हायड्रेट होते , ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते. जेव्हा, आपण गरम पाणी पितो. तेव्हा आपल्या शरीरातील अंतर्गत तंतू शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील विषारी तंतू बाहेर टाकले जातात. त्यामुळे गरम पाण्याने त्वचा स्वच्छ आणि नैसर्गिकरित्या चमकते.
या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या
हे ही वाचा:
आहारात मीठाचा अतिवापर केल्यास उदभवू शकतो हृदयविकाराचा धोका
ग्लासचा वापर करून सोप्या पद्धतीने बनवा अळूवडी…