spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

6-6-6 Walking Rule, आरोग्य नियमित राहण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करतात ?

Walking Rule: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक जण नियमित व्यायाम करत असतात. काही जण योगा करतात तर काही जण जिममध्ये जावून घाम गाळतात. परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नसते. यामुळे रोज चालणे सर्वात प्रभावी व्यायाम आहे. सकाळी चालण्याचे ६-६-६ वाकिंग रूल वेगाने लोकप्रिय होत आहे. या नियमात सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता ६० मिनिटांचा वॉक केला जाते. त्यात सहा मिनिटांचा वार्म-अप, ६ मिनिट कुल-डाऊनचा समावेश आहे. या नियमामुळे तुमचे आरोग्य चांगले राहणार नाही तर दीर्घ कालावधीपर्यंत तुम्हाला त्याचा पुढे फायदा होणार आहे.

सकाळी सहा वाजता ताजी हवा आणि शांत वातावरण असते. त्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवसभर तुम्हाला चांगली ऊर्जा मिळते. संध्याकाळी सहा वाजता केलेला वॉक कामाचा तणाव कमी करतो. त्यामुळे शरीराला आराम मिळतो. तसेच सहा मिनिटांचा वार्म-अप आणि कूल-डाउन शरीराला दुखापतीपासून वाचवत असतो. त्यामुळे ६-६-६ हा फंडा यशस्वी होत आहे. सोशल मीडियावर फंड्याची चर्चा रंगली आहे. सहा मिनिटांचा वार्मअपने तुमचे स्नायू सक्रीय होतात. तसेच ह्रदयाचे ठोके हळूहळू वाढतात. त्यामुळे या सहा मिनिटांत हळूहळू चालण्याचा सल्ला दिला जातो. कूल डाऊनमुळे ह्रदयाचे ठोके सामान्य होतात. तसेच स्नायूवरील ताण कमी होतो. यामुळे हळूहळू चालणे आणि दीर्घ श्वास घेण्यासोबत स्ट्रेचिंग करण्याचा समावेश होत आहे.

६-६-६ वॉकीग रूलचा आरोग्यास होणारा फायदा

  • नियमित चालल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. ह्रदयाचा आजार होण्याचा धोका कमी होतो.
  • कॅलरीचा परिपूर्ण उपयोग होतो. तसेच वजन नियंत्रणात राहतो.
  • दिवसभरातील शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होतो. झोप चांगली येत.
  • संध्याकाळच्या वॉकमुळे तणाव कमी होतो. मानसिक आरोग्य चांगले होते.

सकाळी लवकर उठण्याची सवय ठेवा. त्यामुळे कोणतीही घाईगडबड न करता तुमचे वॉकचे काम पूर्ण होईल. संध्याकाळी काम संपल्यावर जेवणापूर्वी चालण्याच्या सवयीचा तुमच्या रोजच्या नियमात समावेश करा. चालताना वातावरणानुसार साधे कपडे वापरा, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

हे ही वाचा:

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३  टक्के मतदान

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss