Saturday, April 20, 2024

Latest Posts

बॉडी शेपनुसार तुम्हाला कोणती Handbag शोभून दिसेल ?

कोणत्याही कार्यक्रमासाठी जाताना, फिरायला जाताना किंवा खरेदीसाठी जाताना महिला आपल्याजवळ हँडबॅग वापरत असतात.

कोणत्याही कार्यक्रमासाठी जाताना, फिरायला जाताना किंवा खरेदीसाठी जाताना महिला आपल्याजवळ हँडबॅग वापरत असतात. या बॅग विविध प्रकारच्या आणि विविध डिझाईनच्या असतात. त्यामुळे चांगली हँडबॅग खरेदी करण्यासाठी महिलांची नेहमी गडबड सुरू असते. आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आणि चांगले दिसावे यासाठी महिला अनेक प्रकारच्या बॅग्स खरेदी करत असतात. कॉलेजपासून अगदी ऑफिसपर्यंत, शॉपिंग पासून ते ट्रॅव्हलिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक मुलीसाठी महत्त्वाचे जर काही असेल तर ती म्हणजे हँडबॅग.. हँडबॅगशिवाय कोणत्याही महिलेचा लूक पूर्ण होत नाही. पण ही हँडबॅग गरजेसाठीच असते. असं नाही तर हँडबॅग देखील तितकीच स्टायलिश आणि आपल्याला शोभेल अशी असायला हवी.

बॉडी शेपनुसार बॅग

उंच आणि बारीक महिलांसाठी – जर तुमची उंची योग्य आहे आणि तुम्ही थोड्या स्किनी असाल तर लांब हँडबॅग घेऊ नका. रुंद, मोठ्या बॅगा तुम्हाला चांगल्या शोभून दिसतील.

कर्व्ही आणि प्लस साईज महिलांसाठी – जर तुमची साईज प्लस आहे. तर लहान आकाराच्या बेंगेमुळे तुम्ही अधिक मोठ्या दिसाल. मिडीयम आकाराची बॅग तुमच्या बॉडीला चांगला लूक देईल.

अँपल शेपच्या महिलांसाठी – या महिलांचा आकार वरच्या बाजूला रुंद असतो. अशा महिलांना छोट्या आकाराच्या तसेच छोट्या स्ट्रीप असलेल्या बॅग सूट करत नाहीत. आपण रुंद बॅग्स ट्राय करण्यास हरकत नाही.

बॅलन्स शेप महिलांसाठी – जर आपली फिगर एकदम बॅलन्स असेल तर मिडीयम आकाराच्या क्रॉसबॉडी बॅग्स निवडणे उचित ठरेल. या आपल्यावर छान सूट होतील.

क्रॉस शोल्डर बॅग – आजकाल क्रॉस शोल्डर बॅगेचा ट्रेंड आहे. आपले हात रिकामे ठेवून अधिक फ्री होऊन फिरण्यासाठी ही बॅग सर्वच महिलांसाठी खास आहे. यामध्ये विविध प्रकार मिळतात. तुम्हाला कुठे जायचं असेल. तर ही क्रॉस शोल्डर लावून तुम्ही बिनधास्त घराबाहेर फिरू शकता. शिवाय ही बॅग तुम्हाला तुमच्या वेस्टर्न आउटफिटवर खूपच सुंदर दिसेल. यामुळे तुमच्या लुकला अधिक शोभा येईल.

टोटे बॅग्स – या बॅग्स नॉर्मल हँडबॅग्सपेक्षा आकाराने थोड्या मोठ्या असतात. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली अथवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांसाठी या बॅगेचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. आपल्याला हव्या त्या वस्तू या बॅगमध्ये घेऊन जाणं यामुळे सोपं होतं. दिवसभराच्या लागणाऱ्या वस्तू या बॅगेमधून मुली व्यवस्थित सांभाळू शकतात. या बॅगमध्ये सर्व वस्तू नीट राहतात, तसेच या बॅग्स कॅरी करण्यास आपल्याला आरामदायक देखील वाटतात.

हे ही वाचा : 

Beetroot च्या सालीने बनवा हेअर मास्क, केसांशी संबंधित समस्या…

तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं का निर्माण होतात ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss