कोरफड जेल, ज्याला “अॅलोवेरा जेल” असेही ओळखले जाते, हे आपल्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. केसांसाठी कोरफड जेल एक नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते आणि त्याचे अनेक फायदे आहेत. कोरफड जेल केसांच्या आरोग्यासाठी खूप प्रभावी आहे. पण हे जेल लावल्यावर लगेच केस धुणे योग्य आहे का?
सर्वांनाच माहीत आहे की कोरफड जेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरफड जेल, ज्याला अॅलोवेरा जेल असेही ओळखले जाते, हे केसांसाठी एक अत्यंत फायदेशीर आणि नैसर्गिक घटक आहे. विशेषतः केसांची निगा राखण्यासाठी. जाणून घेऊयात कोरफड जेलचा केसांसाठी होणार फायदा.
कोरफड जेल लावल्यानंतर काय करावे:
कोरफड जेल केसांवर लावल्यावर किमान १५-२० मिनिटे ते केसांवर राहू द्या. यामुळे जेलचे पोषणकारी आणि हायड्रेटिंग गुणधर्म केसांमध्ये मुळापर्यंत प्रवेश करू शकतात. १५-२० मिनिटांनी हलक्या गार पाण्याने केस धुवा. त्यासाठी शॅम्पू किंवा हलका कंडिशनर वापरता येईल. कोरफड जेलने केस मऊ आणि ताजे होतात, म्हणून शॅम्पू वापरण्याआधी ते थोडा वेळ असू द्यावं. जर तुम्ही केसांना ताजे कोरफड जेल लावत असाल तर लगेच शॅम्पू करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही 5 ते 6 तासांनंतर तुमचे केस धुवू शकता.
कोरफड जेल वापरण्याची पद्धत:
- आपल्याला केसांसाठी कोरफड जेल वापरायचे असल्यास, त्याचे ताजे जेल वापरणे अधिक फायदेशीर आहे.
- कोरफड जेल केल्यावर आपल्या केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत लावा.
- १५-२० मिनिटे ठेवा आणि नंतर हलक्या गरम पाण्याने धुवा.
- हे एक नैसर्गिक कंडिशनर म्हणून वापरल्याने केस मऊ आणि चमकदार होतात.
कोणत्या प्रकारचा शॅम्पू लावावा?
अनेकवेळा कोरफड जेल लावल्याने केस चिकट होऊ शकतात. अशावेळी तुम्ही केसांना शॅम्पू करून स्वच्छ धुवून केसांवरील चिकटपणा दूर करता येतो. अशाने तुमचे केस चमकदार राहतात. मात्र केस धुवताना केवळ सौम्य शॅम्पूचा वापर करावा. यामुळे केसांचे नुकसान होत नाही. व केसांवर कोणतेच दुष्परिणाम होत नाही.
हे ही वाचा :