Thursday, April 25, 2024

Latest Posts

अंघोळीच्या आधी केसांना या गोष्टी न चुकता लावा…

पुरुष असो किंवा महिला आपले केस हे सर्वांनाच प्रिय असतात. केसांमुळे आपले सौंदर्य अजूनच फुलते. आपल्यापैकी प्रत्येकालाच दाट केस हवे असतात. पण आजकाल केस गळतीच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे केसांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत.

पुरुष असो किंवा महिला आपले केस हे सर्वांनाच प्रिय असतात. केसांमुळे आपले सौंदर्य अजूनच फुलते. आपल्यापैकी प्रत्येकालाच दाट केस हवे असतात. पण आजकाल केस गळतीच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे केसांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. शिवाय अकाली पांढरे केस होणे, केसात कोंडा होणे, केसात खाज सुटणे अश्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. या गोष्टींमुळे आपल्या केसांची चमक निघून जाऊन आपले केस रखरखीत बनतात. आपले केस मऊ होण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. वेगवेगळे प्रोडक्टस वापरतो. पण असे काही घरगुती उपाय आहेत जे केल्याने आपण आपले केस खराब होण्यापासून वाचवू शकतो. केस धुण्याआधी आपण जर हे उपाय केले तर आपले केस हे मुलायम आणि त्याचबरोबर चमकदार बनू शकतात. चला तर मग जाणून घेऊया हे घरगुती उपाय आहेत तरी कोणते?

नारळाचे तेल (Coconut oil)

केस धुण्याआधी प्रत्येकाने नारळाचे तेल वापरलेच पाहिजे. नारळाचे तेल आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर आहे. नारळाच्या तेलापासून आपल्या केसांना उपयुक्त असलेले घटक मिळतात. नारळाचे तेल नियमित वापरल्याने आपले केस दाट होतात व आपल्या केसांवर चमक येते. त्याशिवाय नारळाचे तेल आपल्या केसांच्या मुळांना लावले तर आपल्या केसांच्या मुळांना भरपूर आराम मिळतो आणि त्यामुळे मूळ मजबूत बनतात आणि त्यामुळेच केस गळतीची समस्याही थांबते. नारळाचे तेल लावल्याने केसांच्या वाढीला गती मिळते.

अंडी (Eggs)

अंडी आपल्या केसांसाठी भरपूर प्रमाणात फायदेशीर ठरते. अंड्यामध्ये देखील अनेक औषधी गुणधर्मे आहेत ज्याने आपले केस मुलायम बनतात. तुम्ही अंड्याचा पिवळा भाग काढून आता नीट फेटून ती पेस्ट आपल्या केसांवर आणि त्याचबरोबर टाळूवर चांगली लावा. आणि साधारण २० मिनिटे केसांमध्येच ठेवून द्या. आणि २० मिनिटे झाल्यानंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्या त्यामुळे केसांना येणार अंड्याचा वास सुद्धा निघून जाईल.

दही (curd)

दह्याचा वापर हा केसांसाठी आवश्यक करावा त्याचेकारण म्हणजे दही आपल्या केसांचा कोरडेपणा कमी करते. दह्याच्या वापरामुळे आपले केस मुलायम बनतात त्याचबरोबर आपल्या केसांना चमक येऊन आपले केस खराब होण्यापासून वाचतात. केस धुण्याआधी साधारण २० मिनिटे तुम्ही दही तुमच्या केसांना लावून ठेऊ शकतात. २० मिनिटे झाल्यावर केस स्वच्छ धुवून टाकावे. अश्याप्रकारे तुमचे केस मऊ होतील.

हे ही वाचा:

पुढच्या आठवड्यापर्यंत येणार मान्सून केरळमध्ये; मुख्यमंत्रांकडून आढावा बैठकांना सुरवात

Yashasvi Jaiswal ला IPLमधल्या कामगिरीमुळे मिळणार टीम इंडियामध्ये स्थान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss