Wednesday, November 29, 2023

Latest Posts

तुम्ही देखील ‘लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप’ मध्ये आहेत? या चुका टाळा

तुम्ही देखील 'लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप' मध्ये आहेत? या चुका टाळा

सगळ्या बऱ्याच गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. या डिजिटल गोष्टीत भरीस भर म्हणजे ‘लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशीप’ (Long Distance Relationship) मुळे अनेकांचे नातेदेखील आता डिजिटल झालेले आहेत. आजकल कोणी एखायाला भेटून नव्हे तर एखाद्याच्या बोलण्यावरून प्रेमात पडतात. नुकतीच पबजी खेळताना प्रेमात पडलेल्या सिमा हैदरची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी ताजीच आहे. आजकाल लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्येही राहाणाऱ्या लोकांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. हे नातं खूप आव्हानात्मक असतं. ज्यामुळे हे नातं जास्त काळ टिकत नाही कारण या नात्यात तुमची छोटीशी चूक तुमचे नाते तोडण्यासाठी पुरेसे ठरते. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुमचे हे नाते टिकवून ठेवायचे असेल तर तुम्ही काही गोष्टी करणे सक्तीने टाळावे. काय आहेत या गोष्टी, जाणून घ्या.

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा-

असुरक्षिततेची भावना नको-

तुमच्या जोडीदाराबाबत तुमच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असेल तर त्यामुळे तुमचे नाते कमकुवत देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुमच्या जोडीदाराचे बाहेर अफेअर असेल असा विचार तुम्हाला वारंवार होत असेल तर तुम्ही ही भीती तुमच्या मनातून काढून टाकली पाहिजे. होय, असा विचार करून तुम्ही तुमचे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप तुटण्यापासून वाचवू शकता. तुम्हाला जर काही पुरावे मिळाले असतील तर तुम्ही पुराव्यांबद्दल स्पष्ट बोलू शकता.

एकमेकांवर वारंवार शंका घेऊ नका-

शंका ही कोणत्याही नात्यासाठी फार वाईट गोष्ट आहे. हे नाते नष्ट करण्याचे काम करते तसेच लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये कधीही शंका निर्माण होऊ देऊ नका. कारण संशयाची भावना कोणत्याही नात्याला नष्ट करते. तुम्ही जर नात्यात राहाण्याचे पक्के केले आहे तर एकमेकांवर विश्वास ठेवायला पाहिजे.

तुलना करणं टाळा-

तुमच्या नात्याची तुलना इतर लोकांशी कधीही करू नका. कारण तुलना केल्याने तुमचा पार्टनर निराश होऊ शकतो आणि तुमचे नाते तुटू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या कही मर्यादा असतात त्यामुळे प्रत्त्येकाचे नाते हे सारखे नसते. त्यामुळे दुसऱ्यांसोबत तुलना करणे टाळावे.

एकमेकांशी खोटं बोलू नका-

जर तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही कधीही एकमेकांशी खोटे बोलू नये. कारण तुमचे खोटे तुमच्या जोडीदारासमोर उघड झाले तर तुमचे नाते तुटू देखील शकते. याशिवाय कोणतेही नाते खोटेपणाच्या आधारावर उभारले जाऊ शकत नाही.

Latest Posts

Don't Miss