सणवार म्हंटल की प्रत्येकाच्याच घरात एक वेगळा उत्साह हा दिसून येतो. प्रत्येकाला सणांमध्ये, विशेषतः दिवाळीच्या वेळी आपल्या कुटुंबासोबत राहायला आवडते. सगळीकडे दिवाळीची रोषणाई ही दिसून येत आहे. संपूर्ण देशभरात दिवाळी हा सण उत्सवात साजरा केला जात आहे. कुटुंबासोबत राहिल्याने सणाची मजा द्विगुणित होते. पण काही वेळा अभ्यास, नोकरी किंवा इतर कारणांमुळे लोकांना सणासुदीच्या निमित्ताने घरी जाता येत नाही. सण हे एकात्मतेचे आणि उत्सवाचे प्रतीक आहे. त्यामुळे कुटुंबापासून दूर राहणाऱ्या लोकांना या काळात खूप एकाकीपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे जर तुम्हालाही दिवाळीला घरी जाता येत नसेल, तर आम्ही तुमच्यासोबत अशाच काही टिप्स शेअर करणार आहोत जेणे करून तुम्हाला सणाच्या काळात अजिबात एकटेपणा जाणवणार नाही. या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही सणाच्या वेळी दुःखी होण्याऐवजी आनंदी राहू शकता.
कुटुंब आणि मित्रांशी बोला – सणांदरम्यान एकाकीपणाचा सामना करण्याचा सर्वात थेट मार्ग म्हणजे कुटुंब आणि मित्रांशी संपर्क साधणे. प्रियजनांशी बोलण्याचा प्रयत्न करा, ते कितीही दूर असले तरीही. व्हिडीओ कॉलिंग, फोनवर बोलणे किंवा मेसेज पाठवणे यामुळे अंतर कमी होते आणि आपलेपणाची भावना येते.
सण उत्सवात सामील व्हा – जर तुम्हाला सणांमध्ये एकटेपणा वाटत असेल तर तुम्ही स्थानिक उत्सव किंवा कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकता. या कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्याने तुम्हाला इतर लोकांशी संपर्क साधण्यात मदत होईल. असे केल्याने तुमचा एकटेपणा देखील दूर होईल आणि तुम्हाला नवीन लोकांना भेटता येईल.
धर्मादाय – जेव्हा तुम्ही इतर लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा तुम्हाला एकाकीपणाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, लोकांशी जोडण्यासाठी तुम्ही परोपकार करणे महत्वाचे आहे. अशा अनेक संस्था आहेत ज्यांना सणासुदीच्या काळात अतिरिक्त मदतीची गरज असते. या काळात तुम्ही तुमचा वेळ इथे देऊ शकता आणि लोकांना मदत करू शकता. यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल.
स्वतःची एक नवीन परंपरा तयार करा – एकटेपणा कधी कधी तुम्हाला अशा संधी देतो ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आनंदाप्रमाणे स्वतःसाठी नवीन परंपरा निर्माण करू शकता. या काळात तुम्ही तुमच्या आवडीचे अन्न शिजवू शकता. घर सजवू शकता आणि तुम्हाला आनंद देणार्या सर्व कामांमध्ये सहभागी होऊ शकता. यामुळे तुम्हाला आनंद होतो आणि सणाच्या काळात तुम्हाला सकारात्मक वाटते.
स्वत:ची काळजी – एकटेपणावर मात करण्यासाठी स्वत:ची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जरी यामुळे एकटेपणाची भावना पूर्णपणे नाहीशी होऊ शकत नाही, परंतु स्वत: ची विशेष काळजी घेतल्यास तुम्हाला बरे वाटू शकते. या काळात तुम्ही त्या सर्व गोष्टी करू शकता ज्या तुम्हाला करायला खूप आवडतात.
हे ही वाचा :
प्रार्थना बेहेरेने शेअर केला चार जणांचा व्हिडिओ,प्रार्थना म्हणते ‘हीच माझी दिवाळी’
MAHARASHTRA: शरद पवारांना भेटायला नागरिकांची गर्दी