Thursday, March 28, 2024

Latest Posts

तुमचे ओठ काळे पडले आहेत? नैसर्गिक रित्या ओठांना गुलाबी बनविण्यासाठी करा हा उपाय

बेसन हे आपल्या त्वचेसाठी अतीशय उपयुक्त आहे. आपण जर बेसन आपल्या त्वचेवर नियमित लावले तर आपल्याला कोणत्याही त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. बेसन मध्ये अनेक गुणधर्म आहेत ते आपल्या त्वचेची काळजी घेतात. तसेच आपल्या चेहऱ्याला उजाळा येण्यासाठी बेसन चा वापर केला जातो.

बेसन हे आपल्या त्वचेसाठी अतीशय उपयुक्त आहे. आपण जर बेसन आपल्या त्वचेवर नियमित लावले तर आपल्याला कोणत्याही त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. बेसन मध्ये अनेक गुणधर्म आहेत ते आपल्या त्वचेची काळजी घेतात. तसेच आपल्या चेहऱ्याला उजाळा येण्यासाठी बेसन चा वापर केला जातो. बेसन मुळे आपल्या त्वचेवरील डेड स्किन (Dead Skin) निघून जाण्यास मदत होते. पण तुम्हाला माहीत आहे का बेसन चा उपयोग हा ओठांवरील टॅन काढण्यासाठी सुद्धा केला जातो. बहुतेक जणांचे वरचे ओठ हे काळे पडलेले असतात. त्याला करणे ही बरीच आहे. त्यामुळे तूम्ही अगदी घरच्या घरीच नैसर्गिक रीत्या ओठांवरील टॅन काढू शकता. तूम्ही घरी बेसन पासून लिप लाइटनिंग मास्क (Lip lightening mask) बनवू शकता. यामुळे तुमच्या ओठावर असलेला टॅन सहज रीत्या निघून जाईल. चला तर मग जाणून घेऊया हा लिप लाइटनिंग मास्क बनवायचा तरी कसा.

बेसन लिप लायटनिंग मास्क बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

बेसन दोन चमचे
मोजक्या प्रमाणात हळद (Turmeric)
आवश्यकतेनुसार दूध (Milk)

बेसन लिप लायटिंग मास्क बनविण्यासाठीची कृती :

बेसन लिप लायटिंग बनविण्यासाठी सर्वात आधी तुम्ही एक वाटी घ्या. त्यामध्ये बेसन, हळद, आणि दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. चांगल्याप्रकारे मिक्स करून त्याची जाड पेस्ट बनवून घ्या. अश्या प्रकारे तुमचा नैसर्गिक लिप लाइटिंग मास्क तयार होईल. त्यानंतर त्याला व्यवस्थित बोटावर घेऊन अलगद हाताने त्याला ओठांवर लावा. ओठांवर लावताना किंचित हळुवारपणे मसाज करा. त्यानंतर ते वळवायला सोडा. वाळल्यानंतर पाण्याने ओठ स्वच्छ धुवून घ्या.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

Latest Posts

Don't Miss