Friday, June 2, 2023

Latest Posts

Aluminium Foil Paper वापरणे टाळा, उद्भवू शकतो आरोग्यावर मोठा परिणाम!

चपात्या आणि इतर विविध खाद्यपदार्थ भरपूर वेळ गरम राहण्यासाठी आपण ते फॉईल पेपर (Foil Paper) मध्ये गुंडाळून ठेवतो. यामुळे गुंडाळलेले खाद्यपदार्थ ॲल्युमिनियम फॉईलमध्ये बराच काळ टीकून उबदार राहतात.

चपात्या आणि इतर विविध खाद्यपदार्थ भरपूर वेळ गरम राहण्यासाठी आपण ते फॉईल पेपर (Foil Paper) मध्ये गुंडाळून ठेवतो. यामुळे गुंडाळलेले खाद्यपदार्थ ॲल्युमिनियम फॉईलमध्ये बराच काळ टीकून उबदार राहतात. परंतु या ॲल्युमिनियम फॉईल (Aluminium Foil Paper) चा आपल्या आरोग्यावर मोठ्याप्रमाणात दुष्परिणाम होतो, हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसते.

आपल्याकडे चपात्या, पराठे व इतर जेवण बराच काळ गरम ठेवण्यासाठी तसेच भरपूर वेळ उबदारपणा टिकून राहण्यासाठी ॲल्युमिनियम फॉईल (Aluminium Foil Paper) चा वापर सर्रास केला जातो. तसेच घरचे जेवण बाहेर किंवा टिफिन साठी नेताना सुद्धा आपण ते ॲल्युमिनियम फॉईल (Aluminium Foil Paper) मधेच नेतो. हॉटेल मधील खाद्यपदार्थ सुद्धा आपल्याला ॲल्युमिनियम फॉईल (Aluminium Foil Paper) मध्ये व्र्याप (WRAP) केलेलेच मिळते. परंतु याच ॲल्युमिनियम फॉईल (Aluminium Foil Paper) चा आपल्यावर नेमका कोणता आणि काय परिणाम होतो चाल तर मग जाणून घेऊयात.

ॲल्युमिनियम फॉईल (Aluminium Foil Paper) मुळे आपल्याला अल्झायमर सारखा भयंकर आजार होऊ शकतो. शास्त्रज्ञानं द्वारे केलेल्या संशोधनांमध्येअसे दिसून आले आहे की,अल्झायमरच्या रुग्णांमध्ये उच्च अ‍ॅल्युमिनियमचे प्रमाण हे अधिक असते.अल्झायमर या आजारात रुग्णाची स्मरणशक्ती ही कमकुवत होते. तसेच रुग्ण लहान लहान गोष्टीं सुद्धा विसरायला लागतो. यामुळेच दैनिंदिन जीवनात आपण ॲल्युमिनियम फॉईल (Aluminium Foil Paper) चा वापर मोठ्या प्रमाणात करणे टाळावे.

ॲल्युमिनियम फॉईल (Aluminium Foil Paper) वापरताना पुढील काळजी घ्यावी.

ॲल्युमिनियम फॉईल मध्ये अम्लीय पदार्थांचे पॅकिंग करणे टाळावे.

खूप गरम पदार्थ ॲल्युमिनियम फॉईल मध्ये पॅक करणे टाळावे.

शिळे अन्न ॲल्युमिनियम फॉईल मध्ये पॅक करणे टाळावे.

ॲल्युमिनियम फॉईलचा सतत वापर करणे टाळावे.

हे ही वाचा : 

Adipurush चित्रपटातील Jai Shri Ram गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

सीबीआयच्या पाच तासाच्या चौकशी नंतर, वानखेडे होणार का निलंबित?

‘Don 3’ मध्ये शाहरुख ऐवजी दिसणार ‘हा’ अभिनेता, लवकरच होणार अधिकृत घोषणा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss