spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

रोजच्या कामामुळे तणाव वाढलाय? तर बॉडी मसाज ठरेल उत्तम…

आजकालच्या धावपळीच्या जीवनात ही बॉडी मसाज हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे निरोगी ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात ही बॉडी मसाज हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे निरोगी ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. सध्याच्या युगात अनेक जण हे मानसिक तणावाचे बळी ठरतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. बराच जणांना ऑफिसच्या कामांनी तणाव येतो. तर काही जणांना वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमुळे तणाव येतो. अश्या वेळेस आपला तणाव घालवण्यासाठी बॉडी मसाज आवश्यक आहे.

मानसिक तणावासह ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून काम करत राहिल्याने अनेकांना पाठदुखीची समस्या भेडसावते. ती दूर करण्यासाठी देखील बॉडी मसाज फायदेशीर ठरते. बॉडी मसाजमुळे तुमचे शारीरिक आरोग्य सुधारण्यात खूप मदत होते. बॉडी मसाजमुळे डोकेदुखी आणि स्नायू दुखणे कमी होते. त्यामुळे स्नायूंचा ताण देखील कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहते. बॉडी मसाजचे अनेक गुणकारी फायदे आहेत. ते फायदे जाणुन घेऊया.

मानसिक आरोग्य सुधारते (Improves mental health) –

बॉडी मसाजमुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे ताणतणाव दूर होतात. आपल्याला खूप मानसिक तणाव जरी असला तरी बॉडी मसाज केल्यावर झोप चांगली लागते. आपल्याला चिंता भेडसावत नाही. बॉडी मसाजमुळे वाईट विचार आपल्या मनात येत नाहीत. आपले मानसिक आरोग्यही सुधारते.

शरीर तंदुरुस्त राहते (The body remains fit.) –

बॉडी मसाज ही योग्य प्रकारे केल्याने स्नायू मोकळे होतात, ज्यामुळे शारीरिक आरोग्य ही सुधारते. बॉडी मसाज शरीराला लवचिक आणि तंदुरुस्त बनवण्यात मदत करते. रोज नियमित बॉडी मसाज केल्याने तुमचे शारीरिक आरोग्य चांगले राहते. आपल्या विविध शारीरिक समस्या ही दूर होतात. आपल्याला एखादे काम करताना थकवा ही जाणवत नाही.

स्नायूवरचा ताण कमी होतो (Muscle tension is reduced.) –

बॉडी मसाज केल्याने शरीराचा ताण कमी होतो. त्या सोबतच स्नायूंना आराम मिळतो. बॉडी मसाज हा आपल्या शरिरातील ताण कमी करतो. आपले शरीर बॉडी मसाजमुळे लवचिक होण्यास मदत करते.

तणाव कमी करण्यास मदत करते (Helps reduce stress) –

बॉडी मसाजमुळे मानसिक तणाव दूर होतो. त्यासोबतच आपल्या चिंता आणि निराशा कमी होण्यास मदत होते. बॉडी मसाजमुळे शरीरातील थकवा दूर होतो, ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगलं राहतं.

रक्ताभिसरण चांगले होते (Circulation is good) –
बॉडी मसाज केल्यामुळे शरिरारतील रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे तुमच्या शरीराला अधिक ऑक्सिजन मिळते. त्यासोबतच शरीराला आवश्यक पोषण मिळते. आपले रक्ताभिसरण सुरळीत झाल्यास त्वचा देखील अधिक तजेलदार आणि निरोगी राहते.

शरिरातील जखमांवर उपाय ठरते (Remedies for injuries in the body) –
मसाज केल्यामुळे शरीरावरील जखमा बऱ्या होतात. बॉडी मसाज केल्याने आपले स्नायू मोकळे होतात. स्नायू मोकळेझाल्याने जखमांवर उपचार करण्यात मदत होऊ शकते. त्यामुळेच जखमा लवकर भरून निघतात.

बॉडी मसाज हा कधी करावा?

काही लोकांना सकाळी बॉडी मसाज करायला आवडते. तर काही लोकांना रात्री बॉडी मसाज करायला आवडतं. पण रात्री बॉडी मसाज करणे हे अधिक आरामदायी ठरतं. तरीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार उचित वेळ निवडू शकता.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा:

घरच्या घरी बनवा Healthy and Tasty नाचणीचे बिस्कीट

घरच्या घरी Healthy oats आणि Honey पासून बनवा टेस्टी कुकीज…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss