Thursday, April 25, 2024

Latest Posts

मुधुमेहासाठी गुणकारी जांभूळ, जाणून घेऊ जांभूळ खाण्याचे फायदे:

उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यातसुद्धा येणारे जांभूळ हे फळ आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. आपण उन्हाळ्यात गावाला जाऊन भरपूर जांभळे खातो पण तुम्हाला माहित आहे का याच जांभळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत .

उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यातसुद्धा येणारे जांभूळ हे फळ आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. आपण उन्हाळ्यात गावाला जाऊन भरपूर जांभळे खातो पण तुम्हाला माहित आहे का याच जांभळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत . जांभूळ हे दिसायला अगदीच लहान असते पण जांभूळ खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत. जांभूळ हे फळ जांभळ्या रंगाचे असून चवीला गोड-तुरट असतात. आयुर्वेदानुसार जांभूळ हे आरोग्यासाठी चांगले आहे. जांभूळ या फळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. असे म्हंटले जाते कि जांभूळ या फळाचा सर्वात जास्त फायदा हा मधुमेह (Diabetes) असलेल्या लोकांना होतो. मधुमेह असलेल्या लोकांनी जांभूळ हे आवश्यक खावे कारण जांभूळ हे फळ रक्तातील साखर कमी करते. तसेच जांभूळ हे फळ किडनी स्टोनच्या (Kidney stone) उपचारासाठी मदत करतो. पचन प्रक्रिया (digestive process) सुधारण्यासाठी सुद्धा हे औषधी फळ कामी येते. जांभूळ या फळामध्ये फायबर, प्रथिने, लोह, कॅल्शियम, कायबोहायड्रेट्स यांचे प्रमाण जास्त असते. जांभुळच नाही तर त्याच्या बियांचे, झाडांच्या पानांचे सुद्धा अनेक फायदे आहेत. अश्या या औषधी गुणधर्म असलेल्या फळाचे अनेक उपयोग आहेत. चला तर पुढे वाचूया.

मधुमेहसाठी रामबाण उपाय:

मधुमेह (Diabetes) असलेल्या लोकांना जांभूळ खाणे आवश्यक आहे. जांभूळ खाल्यामुळे मधुमेह control मध्ये राहते. माहितीनुसार संशोधनात असे जाहीर केले आहे कि जांभूळ ह्या फळामध्ये हायपोग्लाइसेमिक हा गुणधर्म आहे. जांभळाच्या बियांमध्ये अल्कलॉइड आहे जे रक्तातील साखर कमी करतात. जांभळाच्या बियांची पावडर, जांभळाचा रस यांचे नियमित सेवन केल्याने मधुमेह कंट्रोल मध्ये राहते.

चेहऱ्यावरील मुरमे कमी करण्यास मदत होते:

जांभूळ हे फळ चेहऱ्यावरील मुरमे(pimples) कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जांभूळ हे फळ गुणधर्मी आहे. अनेकांना आपल्या त्वचेची काळजी असते. आजकाल हार्मोनल चेंजेस, जंक फुड, प्रदूषित हवा अशा अनेक कारणांमुळे पिंपल्स चा त्रास होतो. कितीही महागडी औषधें वापरूनही मुरुमे कमी होत नाही. जांभळाचा रस हा मुरुमे कमी करण्यासाठी अतिशय औषधी आहे. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही मुरुमांच्या त्रासापासून मुक्त व्हाल.

डोळ्यांसाठीचे फायदे:

आजकाल अनेकांना डोळ्यांचे त्रास होत असतात. मोठ्यांपासून ते लहानपर्यंत सगळेच मोबाइल, कॉम्पुटरचा वापर जास्त करतात त्यामुळे अनेकांना डोळ्यात जळजळ आणि वेदना होतात. यासाठी तुम्ही ४०० मिली पाण्यात काही जांभळाची पाने टाकून ती शिजवून घ्यावी आणि नंतर थंड करून डोळे धुऊन घ्यावे.

रक्ताचे शुद्धीकरण (Blood purification) :

जांभूळ हे रक्त शुद्धी करण्याचे काम मोठ्याप्रमाणावर करते. जांभळाची सालं हि आपल्या शरीरातील रक्त आतून शुद्ध करण्याचे काम करतात त्यामुळे आपल्या शरीरातले विषारी toxins शरीरातून निघून जातात व आपली त्वचा (skin) आतून व बाहेरून शुद्ध राहते. त्यामुळे आपल्या त्वचेला काहीही त्रास होत नाही.

किडनी स्टोन च्या उपचारासाठी उपयुक्त:

आजकाल किडनी स्टोन हा १० पैकी ८ जणांना तरी होत असतो. माहितीनुसार पिकलेले जांभूळ खाल्याने हे स्टोन आतल्याआत विरघळतात. तसेच १० मिली जांभळाचा रस पिऊन त्यात मिठाचे खडे टाकून दिवसातून हा रस २ ३ वेळा प्यायल्याने मूत्रमार्गात अडकलेले खडे ते लघवीमार्गातून बाहेर येण्याची शक्यता असते.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

 

हे ही वाचा : 

Summer Tips, उन्हाळ्यात सुती कपडे घालण्याचे आहेत ‘हे’ फायदे

बनवा घराच्या घरी झटपट टोमॅटो राइस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss