Thursday, March 28, 2024

Latest Posts

सावधान! चुकीच्या पद्धतिने ब्लॅकहेड्स काढतायतं? चेहऱ्यावर पडू शकतात कायमचे डाग

आजकाल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेडस असतात. आपल्या चेहऱ्यावर ब्लॅकहेडस येण्याची करणेही अनेक आहेत. अनेक जण आपल्याला ब्लॅकहेड्स काढण्याचे सल्ले देत असतात. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी आपण अनेक वेगवेगळे उपाय करत असतो.

आजकाल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेडस असतात. आपल्या चेहऱ्यावर ब्लॅकहेडस येण्याची करणेही अनेक आहेत. अनेक जण आपल्याला ब्लॅकहेड्स काढण्याचे सल्ले देत असतात. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी आपण अनेक वेगवेगळे उपाय करत असतो. ब्लॅकहेडस म्हणजेच चेहऱ्यावरील काळे डाग. ब्लॅकहेड्स हे आपल्याला काही लहानपणापासून नसतात. पण जेव्हा आपण तारुण्यात येतो आणि स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा उन्हाच्या त्रासामुळे किंवा अपुऱ्या झोपेमुळे आपल्याला हे ब्लॅकहेड्स येऊ शकतात. काहीवेळा आपण दिवसातून फक्त एकदाच चेहरा धुतो त्यामुळेसुद्धा ब्लॅकहेड्स च्या समस्या निर्माण होतात. ब्लॅकहेड्स हि एक आपल्या चेहऱ्यावरील असलेल्या लहान गॅप मध्ये साठून राहिलेली विशिष्ट प्रकारची घाण असते. आणि हि घाण पटकन निघत नाही तिला योग्य पद्धतीनेच काढावे लागते. ब्लॅकहेड्स मुळे आपल्या चेहऱ्यावरचे सौंदर्य बदलून जाते. आपल्या चाऱ्यावर काळे डाग दिसून येतात आणि आपल्या अनेकांना हे ब्लॅकहेड्स अजिबात आवडत नाही. त्यामुळे हे ब्लॅकहेड्स वेळोवेळी काढणे अतिशय आवश्यक आहे. प्रामुख्याने हे ब्लॅकहेड्स आपल्या चेहऱ्यावर नाकाच्या बाजूला, हनुवटीजवळ आणि काही वेळेस गालावर सुद्धा येतात. हे ब्लॅकहेड्स काढून टाकुन आपला चेहरा स्वच्छ व नीटनेटका ठेवणे अत्यंत गरचेचे आहे. पण जर तुम्ही हे ब्लॅकहेड्स चुकीच्या पद्धतीने काढत असाल तर तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर कायमचे डाग पडू शकतात. ब्लॅकहेड्स काढताना तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही योग्य खबरदारी घेतली नाही तर तुमची त्वचा खराब होऊ शकते. चला तर मग आम्ही दिलेल्या माहिती मधून ब्लॅकहेड्स काढताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.

नखांचा वापर करू नये

ब्लॅकहेड्स काढताना कधीही नखांचा वापर करू नये. ब्लॅकहेड्स नखांमधून काढताना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा धोका हा कायम असतो. अनेकदा चेर्याव्र जखमा होऊन रक्तहि येऊ शकता. जखमा झाल्याने चेहऱ्यावर डाग पडतात. त्यामुळे तुमची त्वचा अजून जास्त खराब होऊ शकते. त्याचबरोबर व्लाकहेड्स ची मूळ हि खोलवर असतात त्यामुळे नखांमधून ते चांगल्याप्रकारे काढले जाऊ शकत नाही. यामुळे तुम्ही कधीही ब्लॅकहेड्स काढताना नखांचा उपयोग करू नका.

जोरात स्क्रब करू नये

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी आपण स्क्रबचा वापर करतो. पण स्क्रब लावताना काही लोक चुकीच्या पद्धतीने लावतात. तुम्ही जर स्क्रब तुमच्या चेहऱ्याला जास्त जोरात चोळला तर तुमची त्वचा खराब होऊन त्यावर पुरळ उठु शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला हलक्या हातानी फेस स्क्रब लावावा. त्यामुळे तुमच्या त्वचेला कोणतीही इजा होणार नाही. स्क्रब तुमच्या चेहऱ्याला अति जोरात चोळल्याने तुमची त्वचा कोरडी होऊ शकते.

सेप्टी पिन किंवा रेझर चा वापर करू नये

अनेक जण ब्लॅकहेड्स काढण्यासाठी सेफ्टी पिन किंवा रेझर चा वापर करतात. अश्या गोष्टींचा ब्लॅकहेड्स काढण्यासाठी वापर करणे हे अत्यंत चुकीचे आहे. आपली त्वचा हि अतिशय संवेदनशील असते त्यामुळे तिला पटकन इजा होऊ शकते. सेप्टी पिन व रेझर चा वापर करणे हे अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे त्वचा सोलण्याची भीती असते. त्याचबरोबर त्वचा खराब होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

ब्लॅकहेड्स काढण्याचा योग्य मार्ग

काही लोक ब्लॅकहेड्स काढल्यावर चेहरा धुवत नाही आणि म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. ब्लॅकहेड्स काढल्यानंतरही योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. ब्लॅकहेड्स काढल्यावर चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे. सर्वात मुख्य म्हणजे ब्लॅकहेड्स काढण्याआधी चेहऱ्याला स्टीम दिली पाहिजे. त्यामुळे ब्लॅकहेड्स लगेच निघण्यात तुम्हाला साहाय्य होईल. तसेच चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी तुम्ही टोमॅटो चा उपयोग करू शकता. टोमॅटो हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

मलबार हिल येथील पार्किंगची समस्या सोडवण्यास दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश

तुमचे तूप भेसळयुक्त आहे का? या ट्रिकस वापरून तुपाची शुद्धता ओळखा

Mothers Day2023, मदर्स डेच्या दिवशी surprise gift देऊन करा आईला चकित

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss