Saturday, June 3, 2023

Latest Posts

सावधान! भरपूर प्रमाणात गोड पदार्थ खाताय ? ‘या’ आजरांच्या धोक्याला देताय निमंत्रण

आपल्या प्रत्येकालाच गोड पदार्थ खायला आवडतात. असे दुर्मिळच लोक असतात जे गोड पदार्थ खात नाहीत. कोणत्याही चांगल्या गोष्टीत आपण गोड पदार्थ बनवतो किंवा बाहेरून आणतो. प्रत्येक सणाला, कोणाच्याही वाढदिवसाला, एकूणच समारंभाच्या कार्यक्रमाला आपल्याकडून गोड पदार्थ हे खाल्ले जातात.

आपल्या प्रत्येकालाच गोड पदार्थ खायला आवडतात. असे दुर्मिळच लोक असतात जे गोड पदार्थ खात नाहीत. कोणत्याही चांगल्या गोष्टीत आपण गोड पदार्थ बनवतो किंवा बाहेरून आणतो. प्रत्येक सणाला, कोणाच्याही वाढदिवसाला, एकूणच समारंभाच्या कार्यक्रमाला आपल्याकडून गोड पदार्थ हे खाल्ले जातात. कोणी चांगले मार्क्स मिळवले कि आपण गोड पदार्थ करतो आणि त्याचे सेवन करतो. अर्थातच आपल्या भारतीय लोकांना कोणतेही कारण नसले तरी आपण गोड पदार्थ खातो. केक, चॉकलेट्स, मिठाया अश्या अनेक गोड पदार्थांवर आपण ताव मारतो. आपण दिवसभरात अनेकदा गोड पदार्थांचे सेवन करतो. साखर हा एक असा पदार्थ आहे ज्याचे आपण रोज सेवन करतो. साखर आपल्या आयुष्यचा एक भागच आहे. आपल्या प्रत्येक जेवणात थोडी का नाही पण साखर हि असतेच. चहातून, भातातून आणि अश्या अनेक पदार्थातून साखर आपल्या शरीरात जाते. पण तुम्हाला माहित आहे का साखरेचे अति प्रमाणात सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी घटक असते. साखरेमुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. साखर हे एक प्रकारचं विष आहे. आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असणाऱ्या साखरेचं आपण रोजच सेवन करतो. पण ही साखर खाऊन आपण अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देत असतो. साखर हि अत्यंत विषारी असते. साखरेचे अति प्रमाणात सेवन केल्यावर आपल्याला अकाली वृद्धत्व येऊ शकत. यांसारखे खूप वाईट आजार देखील आपल्याला होऊ शकतात. असे हे गोड पदार्थ आपल्या शरीरासाठी वाईट असतात. गोड पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्यामुळे आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात. चला तर मग याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.

हृदयावर परिणाम होतो (Heart disease)

गोड पदार्थ हे सगळयांनाच आवडतात . प्रत्येकालाच गोड पदार्थ हवेहवेसे वाटतात. पण तुम्ही या गोड पदार्थांचे अति प्रमाणात सेवन करत असाल तर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. शास्त्रज्ञ यांच्या संशोधनाच्या आधारे असे सिद्ध झाले आहे की ज्या पेयांमध्ये भरपूर प्रमाणात साखर असते असे पेय प्यायल्याने आपल्या रक्तदाबावर त्याचा विचित्र परिणाम होऊ शकतो. साखरेचे जास्त सेवन केल्याने आपल्या शरीरात असलेल्या अतिरिक्त साखरेचे परिवर्तन हे फॅट मध्ये होते. त्यामुळे हृदय विकार होण्याचा संभव असतो. आणि त्याचा परिणाम होऊ शकतो.

वजनवाढीवर परिणाम होतो (Weight Gain)

प्रत्येक सणाला आपल्या घरी गोड पदार्थ बनतात. आणि आपण ते मनोसक्त खातो. आपण गोड पदार्थ भान न राहता अति प्रमाणात खातो. त्यामुळे आपल्याला लठ्ठपणा येऊ शकतो. जास्त साखर खाल्याने आपले वजन वाढते. जास्त कॅलेरीज खाल्याने तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

त्वचेवर परिणाम होतो (Skin Effect )

जास्त प्रमाणावर गोड खाल्यावर तुमच्या तवचेवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. साखरेचे जास्त सेवन केल्यामुळे तुमचे सौंदर्य भिडहदू शकते. जास्त प्रमाणात गोड पदार्थ तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात. आणि चेहऱ्यावर मुरुमे, काळे डाग अश्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते. गोड पदार्थामध्ये कोलेजन एकमेकांशी जोडले जाते आणि त्याच कारणामुळे तुमची त्वचा घट्ट होते. त्यामुळे तुम्ही अति गोड खाणे टाळले पाहिजे.

मेंदूवर परिणाम होतो ( Brain Efeect )

तुम्ही साखरेचे अति सेवन करत असाल तर ते आताच टाळा. कारण साखरेच्या अतिसेवनामुळे तुमच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. मेंदू च्या कार्यासाठी आपल्या शरीरातील ग्लुकोज गरजेचे आहे. आपल्या शरीरात साखर वाढल्याने नुरोट्रान्समीटर आणि रासायनिक संदेशवाहक बरोबर प्रमाणात तयार होत नसून न्यूरॉन्स आणि चेतापेशीलमधील संवाद तुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या ९ मुलींपैकी ७ मुलींना वाचवण्यात यश २ मुली मृत्यू

दह्यासोबत खाताय का हे पदार्थ? आरोग्यासाठी अतिशय घातक

Parineeti-Raghav चा रॉयल साखरपुडा, गाणं गात दिले सरप्राईज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss