Saturday, June 3, 2023

Latest Posts

गरमीमुळे किचन मध्ये काम करवत नाही? कूल किचन साठी फॉलो करा आमच्या सालस टिप्स

उन्हामुळे संपूर्ण घर तापलेल असतं. घरभर उन्हाचे चटके जाणवत असतात. पण किचन सोडलं तर इतर खोल्यांमध्ये या गरम तापमानावर मात करण्यासाठी पंखे, AC, कुलर यांची सोय असते.

उन्हामुळे संपूर्ण घर तापलेल असतं. घरभर उन्हाचे चटके जाणवत असतात. पण किचन सोडलं तर इतर खोल्यांमध्ये या गरम तापमानावर मात करण्यासाठी पंखे, AC, कुलर यांची सोय असते. किचन मध्ये पंखा लावलेला असून त्याचा आपल्याला पेटवलेला गॅस जाईल या भीतीने वापर करता येत नाही. त्यामुळे स्वयंपाक बनवताना सारखे दुसऱ्या खोली मध्ये हवा खायला आपण जात असतो. किचन मध्ये आपण जेवण बनवण्यासारख्या वेगवेगळ्या प्रक्रिया करत असतो त्यामुळे किचन मध्ये इतर खोल्यांपेक्षा जास्त उष्णता व वाफ तयार होते.त्यामुळे किचन मध्ये इतर खोल्यांपेक्षा जास्त उकडतं आणि याच कारणामुळे किचन मध्ये राहून स्वयंपाक बनवणे खूप कठीण होऊन बसते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर किचन अतिशय तापमान अतिशय वाढलेलं असतं. लहान किचनला तर या तापमान वाढीचा जास्तच फटका बसतो कारण मोठ्या किचन पेक्षा लहान असलेले किचन हे पटकन गरम होते. पण तुम्हाला माहित आहे का कि किचन थंड करण्यासाठीही काही उपाय आहेत. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यातही किचन मध्ये काम करू शकता. चला जर मग आपण जाणून घेऊया ते सोप्पे उपाय.

इन्डक्टशन( Induction) चा वापर करा:

प्रत्येक घरात जेवण बनवण्यासाठी गॅस चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण याच गॅसमुळे किचन मध्ये उष्णता निर्माण होते. ज्यामुळे किटाचं मध्ये खूप उकडत आणि काहीही काम करावंसं वाटत नाही. तुम्ही जर गॅस ऐवजी इंडक्शन चा वापर करण्यास सुरुवात केली तर मग किचन मधली उष्णता कमी होते आणि किचन थंड राहते. त्यामुळे तुम्ही इंडक्शन चा वापर करण्यावर भर द्या.

जेवण बनवताना एक्झॉस्ट फॅनचा (exhaust fan) वापर करा:

साधारण प्रत्येक जण हा एक्झॉस्ट फॅनचा वापर हा जेव्हा किचन मध्ये जास्त धूर होतो तेव्हाच करतो तो तसे करू नका. कारण हा फॅन हा उन्हाळ्यातही अतिशय कामी येतो. उन्हाळ्यात हा फॅन तुम्ही नेहमी प्रमाणे चालू ठेऊ शकता त्यामुळे खोलीत हवा खेळती राहते आणि खोली थंड राहण्यासाठी मदत होते. म्हणून एक्झॉस्ट फॅनला तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे.

किचनमध्ये टेबल फॅन लावा:

आजकाल टेबल फॅन (table fan) खूप कमी जणांकडे असतो. सिलिंग फॅन मुळे टेबल फॅनची लोकप्रियता कमी झालेली दिसते. पण या टेबल फॅनचा उपयोग तुम्ही किचनमध्ये करू शकता. टेबल फॅनची हवा हि तुमच्यापुरती मर्यादित असल्यामुळे गॅस जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

इलेकट्रीक (Electric) वस्तूंचा वापर कमी करा:

उन्हाळ्यात मायक्रोवेव्ह सारखी साधने वापरणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. इलेकट्रीक वस्तूंच्या वापरामुळे किचन मध्ये उष्णता निर्माण होते व त्यामुळे स्वयंपाक करताना जास्त उकडत.

किचनमधील खिडक्यांवर सुती पडदे लावा:

किचनमधील खिडक्यांमुळे सुद्धा किचनमधली उष्णता वाढते. त्याचे कारण म्हणजे सूर्याची किरणे हि थेट खोलीत येऊ शकतात. आणि उन्हाळामुळे खिडक्या तापतात. त्यामुळे यावर सोप्पा उपाय म्हणजे तुम्ही किचन मधील खिडक्यांवर सुती कापडाचे पडदे लावू शकता. तसेच योग्य वेळी खिडकी उघडी ठेवा. त्यामुळे खोलीत हवा खेळती राहते.

हे ही वाचा : 

Dadar मधील Foods Mafiya स्टॉलवर मिळतो Butter Chiken Pav

‘द केरला स्टोरी’ चित्रपट बघितल्यावर राजकारण्याची भूमिका

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा, घरगुती मसाला ताक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss