Saturday, April 20, 2024

Latest Posts

Car Care Tips: गाडी मधून येतोय विशिष्ट प्रकारचा वास?

बहुतेकवेळी गाडीमध्ये बसल्यावर अत्यंत दुर्गंधी वास येतो त्या वासामुळे आपल्याला गाडीमध्ये बसवत सुद्धा नाही. याच्यावर उपाय म्हणून आपण बाजारातून कार फ्रेशनर (Car Freshner) विकत घेतो. पण कार फ्रेशनरचा काहीही उपाय होत नाही.

बहुतेकवेळी गाडीमध्ये बसल्यावर अत्यंत दुर्गंधी वास येतो त्या वासामुळे आपल्याला गाडीमध्ये बसवत सुद्धा नाही. याच्यावर उपाय म्हणून आपण बाजारातून कार फ्रेशनर (Car Freshner) विकत घेतो. पण कार फ्रेशनरचा काहीही उपाय होत नाही. उलट दोन्हीही वास एकमेकांत मिसळल्यामुळे अजूनच तीव्र वास येऊ लागतो. या वासामुळे आपल्याला जास्त प्रमाणात त्रास होतो. गाडीमध्ये उलटी सारखेवाटू लागते त्याचबरोबर डोकेदुखीची सुरुवात होते. त्याचबरोबर गाडीमध्ये एसी लावल्या कारणाने खिडक्यादेखील उघडता येत नाही त्यामुळे अजूनच कोंडातल्या सारखे वाटते. मात्र या दुर्गंधी वासाचेही अनेक करणे आहेत. प्रवास करत असताना आपण गाडीमध्ये बसून विविध पदार्थ खात असतो. त्यामुळे काही वेळेस आपल्याकडून पदार्थ गाडीमध्ये पडतात आणि ते तसेच पडून राहतात. या गोष्टी आपण वेळोवेळी साफ केल्या नाहीत तर त्याचा गाडीमध्ये सर्वत्र वास पसरतो. आपण गाडी मध्ये चपला, शूज घालूनच बसतो त्यामुळे गाडी मध्ये घाण होते आणि या घाणीमुळे वास पसरतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही यावर काही उपाय सांगणार आहोत.

दररोज गाडी स्वच्छ करा (Clean the car daily)

आपण गाडी विविध प्रकारचे तेलकट पदार्थ खातो. काही वेळेस आपण कोल्ड्रिंकच्या बॉटल्स, चहाचे कप, कॉफीचे कप गाडी मधेच ठेवतो. काही वेळेस आपल्या चपलेला घाण लागली असते. त्यामुळे आपल्या गाडीत ती घाण साचून राहते व अस्वच्छता पसरते. त्यामुळे आपण आठवड्यातून एकदाच गाडी साफ करतो पण तसे करी नका. रोज तुम्ही गाडी पार्क केली की त्याचवेळी गाडी पुसून घ्या. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुमच्या गाडी मध्ये दुर्गंधी वास येणार नाही.

गाडीच्या खिडक्या उघडा (Open the car windows)

अनेकदा आपण गाडीत बसल्या बसल्या एसी लावतो आणि खिडक्या उघडतच नाही पण तसे करू नका. गाडीत बसल्यावर थोडावेळ खिडक्या उघडून ठेवा त्यामुळे गाडीत पसरलेला दुर्गंध गाडीतून निघून जाईल. आणि गाडीमध्ये फ्रेश (Fresh) हवा येईल. त्यामुळे तुम्हालाही अगदी प्रसन्न वाटेल आणि कसलाच त्रास होणार नाही.

बेकिंग सोड्याचा वापर (Use of baking soda)

बेकिंग सोड्याचा वापर हा दुर्गंधी शोषून घेण्यासाठी केला जातो. त्यामुळे गाडीतला दुर्गंध निघून जाईल. तुम्ही बेकिंग सोडा हा एका डब्यात घालून तो गाडीमध्ये ठेवा. हा बेकिंग सोडा काही दिवसानंतर बदलत रहा आणि गाडी स्वच्छ धुवून साफ करा.

व्हाईट व्हिनेगरचा वापर (Use of white vinegar)

व्हाईट व्हीनेगरचा वापर करून गाडीची साफसफाई करा. तुमच्याकडे असलेले एक छोटेसे भांडे घ्या त्यामध्ये व्हिनेगर आणि पाणी टाकून घ्या. त्यानंतर स्पंज किंवा मऊ कापडाने गाडी स्वच्छ पुसून घ्या. गाडीतील आतील भाग वाळविण्यासाठी गाडीचे दरवाजे उघडे ठेवा.

हे ही वाचा : 

पगार हातात टिकत नाही? पैशांची बचत करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

हा चायनीज पदार्थ बनवा काही मिनिटात; जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

Shubman Gill ने झळकावली एकाच सीझनमध्ये तीन शतके, अंतिम सामन्यात चौथे शतक?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss