spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

Periods च्या वेळी घ्यावयाची काळजी!

स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मासिक पाळी. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एका विशिष्ट वयामध्ये मासिक पाळी सुरु होते आणि ती एका विशिष्ट वयापर्यंत सुरु राहते. पण या दिवंसात महिलांना अनेक समस्यानां सामोरे जावे लागते.

स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मासिक पाळी. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एका विशिष्ट वयामध्ये मासिक पाळी सुरु होते आणि ती एका विशिष्ट वयापर्यंत सुरु राहते. पण या दिवंसात महिलांना अनेक समस्यानां सामोरे जावे लागते.

मासिक पाळी दरम्यान आपल्या शरीरात बरेच बदल होत असतात जसे कि स्तन हळवे होणे, पोट कडक वाटणे, डोकेदुखी, झोप न लागणे, चिडचिड, थकवा, थोडे वजन वाढणे, आदी त्रास होतात. ही सर्व लक्षणे शरीरात हार्मोन्सच्या बदलांमुळे होतात. पाळीच्या आधी १-२ आठवडे किंवा माग ४-५ आधी हा त्रास होतो. पाळीची तारीख जवळ येईल तसे मानसिक त्रास वाढतात. शारीरिक त्रासही थोडेफार वाढतात. आणखी एक प्रकार म्हणजे पाळी सुरु झाल्याझाल्या ओटीपोटात दुखून येते. हे दुखणे थोडा वेळ टिकून, थांबून थांबून येते. पाळीच्या ३-४ दिवसांत हा त्रास चालूच राहतो. परंतु काही पथ्य पाळली तर हा त्रास कमी होऊ शकतो आणि आपणास आराम मिळू शकतो. आज आपण याबद्दल च जाणून घेणार आहोत. मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी.

पाळी सुरू असताना आहार हलका व नेहमी पेक्षा कमी प्रमाणात घ्यावा. तेलकट तळलेले, मसाल्याचे चमचमीत पदार्थ खाऊ नयेत. या दिवसात शरीरातील ऊर्जा कमी झालेली असते. आहार जास्त घेतला तर त्याचे पचन व्यवस्थित होत नाही. अपचनामुळे शरीरातील आम निर्मिती होऊन बरेच आजार जडतात, म्हणून शरीराला उत्साह व बळ मिळेल असा हलका आहार घ्यावा. भाज्यांचे सूप, शहाळ्याचे पाणी,संत्री,मोसंबी अशा प्रकारच्या फळांचे रस तसेच नाचणीची पेज घ्यावी. शक्यतो जेवण ताजे व गरम असावे. पालक, माठ, चाकवत, राजगिरा यांसारख्या भाज्या खाव्यात. टोमॅटो,गाजर यांची कोशिंबीर व जीवनसत्वे प्रोटीन युक्त आहार घ्यावा. दूध, कडधान्य ,फळे, भाज्या यांचा समावेश असावा. वेदनाकमी करण्यासाठी अजवाईन गरम किंवा कोमट पाण्यामध्ये घ्या.

तसेच या काळात कोमट पाणी प्यायल्याने पोटदुखी कमी होऊन मासिक पाळी व्यवस्थित होण्यास मदत करते, पचन सामान्य ठेवते, तसेच भूक आणि चव सुधारते. त्यामुळे शक्यतो कोमट पाणी प्यावे. आहारात काही प्रमाणात तुपाचा समावेश करावा. ते पचनास मदत करते, अपान वात खालच्या दिशेने राखते त्यामुळे उदरपोकळी कमी होऊन मासिक पाळी येण्यास मदत होते. तसेच तूप हे आपले मन शांत करते म्हणून आयुर्वेदामध्ये तूप दररोज सेवन करण्याची शिफारस केली जाते. तसेच महिलांमध्ये दररोज आहारात योग्य प्रमाणात समावेश केल्याने तणाव, चिंता, मनःस्थिती बदलणे, भीती इत्यादीपासून मुक्त होतो. आहारात दूध, जव असा आहार घ्यावा.

Latest Posts

Don't Miss