Children’s Diet Before 10th Exam : १० विच्या मुलांच्या उद्यापासून म्हणजे २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत. बोर्ड परीक्षेच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा सुरु होत असून शाळकरी मुलांसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे वार्षिक परीक्षांचा काळ. या काळात केवळ बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनीच नाही तर सर्व वर्गातील मुलांनी व त्यांच्या पालकांनी आहाराकडे आणि झोपेकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. परीक्षेची तयारी करत असताना किंवा परीक्षेच्या काळात अभ्यास करणे जितके महत्वाचे आहे तितकेच मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे देखील तितकेच महत्वाचे आहे. परीक्षेच्या काळात योग्य आहार घेतला नाही, तर त्यांच्या आरोग्यावर आणि परीक्षेवर परिणाम होऊ शकतो. तर जाणून घ्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मुलांनी कोणता सकस आहार घ्यावा आणि कोणता आहार टाळावा.
बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी मुलांनी सकस आणि पौष्टिक आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चांगला आहार त्यांना ऊर्जा, एकाग्रता, आणि मानसिकबळ वाढवण्यास मदत करतो. पण अशा परिस्थितीत अनेक मुले एकतर नीट जेवत नाहीत किंवा परीक्षेच्या तणावाखाली विचित्र पदार्थ खातात. अशा स्थितीत, न खाण्यापेक्षा काहीतरी खाणे चांगले आहे हे पालकांनाही पटवून देता येत नाही. त्यावेळी मुलं बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राइज,चॉकलेट, केक, पेस्ट्री, बर्फी अश्या अनेक पदार्थांचे मुलं सेवन करतात. त्यामुळे अनेक वेळा मुलांना भूक लागत नाही. अभ्यासाकडे देखील लक्ष केंद्रित करता येत नाही. त्यामुळे मुलांना वेळोवेळी काहीतरी योग्य खायला देत राहा. भूक लागली नसली तरी काही ना काही खात राहणे चांगले.
मुलांनी कोणता आहार घ्यावा?
फळे आणि भाज्या:
संत्रा, सफरचंद, केळी, पेरू, किव्ही, बोरं ह्या फळांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजे असतात.
गाजर, पालक, ब्रोकोली, कोबी, मुळा आणि टोमॅटो ह्या भाज्या शरीर आणि मेंदूसाठी उत्तम असतात.
प्रोटीनयुक्त पदार्थ:
अंडी, कोंबडी, पनीर, मसूर, सोया आणि दाल्स ह्या प्रोटीनयुक्त पदार्थांमुळे मेंदूला आवश्यक पोषण मिळते.
जेवण :
दुपारच्यावेळी आहारात संपूर्ण आहार घ्यावा. त्या आहारात चपाती, भाजी,भात, डाळ आणि सलाड याचा समावेश असणे गरजेकजे आहे. त्याचबरोबर रात्रीच्या जेवणार चपाती किंवा भाकरीचा समावेश असावा पण भाताचे प्रमाण कमी असावे.
ब्रेकफास्ट :
फॅट दूध, म्युसली, अंडी, अंडी आणि टोस्ट, दही, ओट्स, केळी, सफरचंद, नाचणी किंवा रवा डोसा, इडली, पपई, ड्रायफ्रुट्स असे अनेक खाद्यपदार्थ तुम्ही मुलांना देऊ शकता.
बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मुलांनी किती वेळ झोप घेणं महत्वाचं आहे :
बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मुलांनी पुरेशी झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. मुलांनी रात्री किमान 6 ते 8 तास झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. या वेळेत शरीर आणि मेंदू दोन्ही ताजेतवाने होतात. झोप आणि उठण्याचा ठरलेला वेळ ठरवून त्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे.