कॉफीचे फायदे अनेक प्रकारे दिसून येतात, पण अधिक सेवनाने काही धोके होऊ शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणात कॉफीचा सेवन करणे महत्त्वाचे आहे. जाणून घ्या फायदे.
अनेकदा अस दिसून येत की, लोक सकाळीच उठताच चहा किंवा कॉफीने दिवसाची सुरुवात करतात. तर काही जण उपाशीपोटी एक कप पितात. कॉफीचे फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टींची नेहमीच चर्चा होत असली तरी एका संशोधनातून असे समोर आले आहे की, कॉफीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, मात्र ती पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी. कॉफी प्यायल्यास हृदय निरोगी राहण्यास सहाय्यक ठरू शकते. काही संशोधनानुसार, नियमितपणे कॉफी सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक सकाळी कॉफी पितात त्यांना हृदयविकाराने मरण्याचा धोका कमी असतो. कॉफी तुमच्या मानसिक ताजेपणामुळे अधिक वेळा आणि प्रभावीपणे लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. दिवसभर कॉफी पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत मृत्यूचा धोकाही कमी होतो. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात. यामुळे धमन्यांमध्ये चरबीचा साच होण्याचा धोका कमी होतो, जो हृदयविकाराच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. काही प्रकारच्या कॉफीमध्ये कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रित ठेवण्याचे गुण असू शकतात, विशेषतः अनफिल्टर्ड कॉफी (जसे की फ्रेंच प्रेस कॉफी). कॉफीमध्ये असलेला कॅफिन टाइप 2 मधुमेहाच्या धोका कमी करू शकतो, जो हृदयविकारांसाठी एक जोखमीचा घटक असू शकतो. यूएस मधील टुलेन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी असे दाखवून दिले की जे लोक सकाळी कॉफी पितात त्यांचा मृत्यू कोणत्याही कारणाने होण्याची शक्यता 16 टक्के कमी असते आणि हृदयविकाराने मरण्याची शक्यता 31 टक्के कमी असते.