spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास ‘या’ फळांचे करा सेवन; नक्कीच याचा फायदा होईल

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणास ठेवणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉलचे उच्च प्रमाण तुमच्या हृदयासाठी धोकादायक ठरू शकते.विशेषतः वाढलेले कोलेस्ट्रॉल हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर गंभीर आरोग्य समस्यांशी संबंधित असू शकते. अत्यधिक कोलेस्ट्रॉलमुळे धमनींमध्ये गाठी (प्लाक) तयार होऊ शकतात. यामुळे रक्तप्रवाह अवरुद्ध होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकार, हार्ट अटॅक किंवा एन्जिना (chest pain) होऊ शकतो. यासाठी काही फळे खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते. यासाठी वाचा सविस्तर माहिती.

शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन प्लेग तयार करते, ज्याला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. हे प्लेग रक्त प्रवाह कमी करू शकते, ज्यामुळे हार्ट स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये गाठी तयार होतात, ज्यामुळे मस्तिष्काला आवश्यक रक्त पुरवठा होऊ शकत नाही. यामुळे स्ट्रोक होऊ शकतो. जर कोलेस्ट्रॉल खूप जास्त असेल, तर ते पायांच्या आणि इतर अंगांच्या रक्तवाहिन्यांना अडथळा निर्माण करु शकते, ज्यामुळे तेथे रक्त पुरवठा कमी होऊ शकतो. यामुळे पायांमध्ये वेदना, कमजोरी, किंवा ह्याच्यामुळे गाठ निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काही स्वस्त फळांचा आहारात समावेश करता येऊ शकतो. यासाठी तुम्ही देखील तुमच्या आहारात या फळांचा समावेश करा.

सफरचंदाचे सेवन करणे ठरेल फायदेशीर
सफरचंदात पेक्टिन नावाचे एक प्रकारचे सॉल्युबल फायबर्स असतात. हे फायबर्स LDL (खराब कोलेस्ट्रॉल) ची पातळी कमी करण्यात मदत करतात. पेक्टिन कोलेस्ट्रॉलच्या अ‍ॅबसॉर्प्शनला अडथळा आणतो आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो. सफरचंदात फ्लावोनॉयड्स आणि व्हिटॅमिन C सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरात होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला कमी करतात. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारणे आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

संत्रे आणि लिंबू सेवन करा
संत्रे आणि लिंबात व्हिटॅमिन C चा प्रचंड प्रमाण असतो. व्हिटॅमिन C हा एक अँटीऑक्सिडंट आहे जो शरीरातील मुक्त रॅडिकल्सचा नायनाट करतो आणि हृदयाच्या आरोग्याला फायदा करतो. व्हिटॅमिन C हृदयाच्या धमन्यांची लवचिकता राखण्यास मदत करतो आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो.

अननसाचे सेवन करा
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास अननसाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. अननसामध्ये अनेक आरोग्यदायक गुणधर्म असतात जे कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करू शकतात. अननसामध्ये ब्रॉमलिन नावाचे एक शक्तिशाली एंझाइम असते. हे एंझाइम शरीरातील इन्फ्लेमेशन (सूज) कमी करण्यात मदत करते आणि हृदयविकार आणि इतर हृदयाशी संबंधित आजारांच्या जोखमीला कमी करते. ब्रॉमलिन कोलेस्ट्रॉलच्या पातळीला नियंत्रित ठेवण्यात मदत करू शकतो.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss