सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतात तो एकमेव सण म्हणजे दिवाळी. भारत देशात, प्रत्येक राज्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतो. परंतु फक्त भारतात नाही तर असे अनेक देश आहेत तिथे सुद्धा दिवाळी हा सण साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये प्रामुख्याने श्रीलंका नेपाळ, गयाना, पाकिस्तान, म्यानमार, मलेशिया आणि अन्य काही देशांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशांमध्ये दिवाळी कशी साजरी केली जाते, ते पाहूया.
१. श्रीलंका:
श्रीलंका या देशामध्ये सुद्धा दिवाळी सण साजरा केला जातो, या निमित्ताने श्रीलंकेमध्ये दिव्यांची आरास केली जाते. लहान मुले मोठ्या हौशीने फटाके वाजवून या सणाचा आनंद घेतात.
२. नेपाळ:
नेपाळमध्ये दिवाळी या सणाला विशेष प्राधान्य आहे. कारण, दिवाळी हा तेथील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण आहे आणि दिवाळी या सणाला नेपाळमध्ये तिहार असं म्हंटल जाते. दशैच्या म्हणजेच दसऱ्यानंतरचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी होय. हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्यातील आमावस्याच्या रात्री दिवाळी मोठ्या आनंदात साजरी केली जाते आणि त्या ठिकाणी तिहारच्या आधी दोन दिवस आणि नंतर दोन दिवस असे एकूण पाच दिवस दिवाळी हा सण साजरा केला जातो आणि यामुळे संपूर्ण देशात सात दिवसांची सुट्टी दिली जाते.
३. फिझी:
फिझी या देशात मोठ्या संख्येने भारतीय लोक राहतात आणि ते लोक पारंपरिक पद्धतीने दिवाळी सण साजरा करतात. विशेष म्हणजे बेटांवर रात्रीच्या वेळी मुख्य कार्यक्रम पार पाडले जातात. महत्वाचं म्हणजे मेणबत्त्या ही अनेक प्रकारे सजावल्या जातात.
४. गयाना:
गयाना देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास ३३ % लोक हिंदू आहेत. दक्षिण अमेरिकेतील (South America) को-ऑपरेटिव्ह रिपब्लिक ऑफ गयाना हिंदू सौर कॅलेंडरनुसार दिवाळी साजरी करतात आणि या देशात अधिकृतपणे सुट्टी जाहीर केलेली असते.
५. पाकिस्तान:
पाकिस्तानमध्ये देखील भारतीय लोक राहतात. पाकिस्तान हा आपल्या लगतचा देश आणि स्वातंत्र्यापूर्वी तो आपल्याच देशात सामिल होता. त्यामुळे दिवाळी तिथे देखील मोठ्या प्रमाणात साजरी होते.
६. म्यानमार:
म्यानमारमध्ये दिवाळी एका विशिष्ट प्रकारे साजरी केली जाते. घरात आतून आणि बाहेरून दिवे लावले जातात आणि अनेक पदार्थ सजवले जातात आणि नवीन वस्त्रे परिधान केले जातात.
७. मलेशिया:
मलेशियामध्ये दिवाळी सण साजरा केला जातो. फक्त घरापुरता न साजरा करता तेथील मोठी दुकाने, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे देखील मोठ्या प्रमाणात रोषणाई केली जाते.
८.त्रिणीनाद आणि टोबॅगो:
परंपरा, रीतीरिवाज, मोठे धार्मिक सण उत्साह हे त्रिणीनाद आणि टोबॅगो ह्या देशाचे अविभाज्य भाग आहेत. एक मोठा समूह पूर्व भारतीय असल्याने या देशात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
तर अशा प्रकारे दिवाळी भारताबाहेर देखील मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरी केली जाते.
हे ही वाचा :
यंदा राजस्थानात कोणाची सत्ता येणार ?
MAHARASHTRA ELECTIONS: मतदानाला सुरवात, उद्या होणार मतमोजणी