दिवाळीची धामधूम संपली असली तरीही दिवाळी सुट्टी आजून बाकी आहे. तसं पाहायला गेलं तर आजकाल मुलांवर शाळा आणि अभ्यासाचा ताण फार वाढत चालला आहे. बरेचदा मुलांना शाळांमध्ये खूप गृहपाठ मिळतो. इतकंच नाही तर शाळा सुटल्यावर घरी आल्यानंतर पुन्हा गृहपाठ करायला लागतात, मग ट्यूशन आणि अभ्यासाला जातात, अशा गोष्टींमुळे मुलांना खूप ताण येऊ लागतो. यामुळेच मुले स्वभावाने चिडचिडी होऊ लागतात. अशात जर पालकांनी आपल्या मुलांसोबत वेळ घालवला किंवा त्यांना बाहेर फिरायला घेऊन गेले तर त्यांचा ताण कमी होऊन ते पुन्हा नव्या जोमाने चांगल्या अभ्यासाला लागू शकतात. सध्या दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने तुम्ही तुमच्या मुलांना फिरायला बाहेर घेऊन जाऊ शकता. चला तर पाहूया बाहेर फिरायला जाण्याचे बेस्ट ठिकाण…
थीम पार्क आणि फन झोन : तुम्ही तुमच्या मुलांना या दिवाळीच्या सुट्टीमध्ये थीम पार्क आणि फन झोन सारखी ठिकाणे घेऊन जाऊ शकता. दररोज मुले अभ्यासात व्यस्त असतात, शाळेतून आणि क्लासमधून दिलेल्या अभ्यासामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी खेळणे, उडी मारणे आणि मजा करणे हे हे देखील महत्त्वाचे आहे. थीम पार्कमध्ये मुले विविध प्रकारचे खेळ, ऍक्टिव्हिटी करतात. ज्यामुळे त्यांना फ्रेश वाटतं उत्साह येतो. ट्रॅम्पोलिन पार्क किंवा बाउंसिंग क्षेत्रासह एक मजेदार ठिकाण देखील आहे.
निसर्गमय संबंधित ठिकाणं : जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुले अभ्यासामुळे थोडे ताणले आहेत आणि तुम्हाला त्यांचा ताण कमी करायचे असेल तर त्यांना निसर्गाशी निगडित ठिकाणी घेऊन जावे. यामुळे त्यांना ताजेतवाने वाटते आणि शाळेच्या गृहपाठाच्या चिंतेतून त्यांना थोडा वेळही मिळतो आणि त्यांना थोडं रिलॅक्स वाटेल. कारण घराबाहेर पडताना गृहपाठाचा विचार त्यांच्या मनात येत नाही. इतकंच नाही तर जेव्हा मुलं निसर्गाच्या जवळ असतात तेव्हा त्यांना झाडं, वनस्पती, पक्षी आणि इतर प्राण्यांबद्दल जाणून घेण्याची संधी मिळते.
मनोरंजन पार्क : तुम्ही तुमच्या मुलांना एखाद्या मोकळ्या मैदानांमध्ये किंवा पार्कमध्ये गेल्याने स्विंग्ज आणि इतर मजेदार राइडमुळे मुलांचा ताण कमी करण्यास मदत करतात. येथे गेल्याने मुले शारीरिक आणि आंतरिकदृष्ट्या मजबूत होतात. येथे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी करायला संधी मिळते, ज्यामुळे त्यांच्यातील आळसही कमी होतो. त्यामुळे, जर तुम्हाला वीकेंडला जास्त खर्च न करता तुमच्या मुलांना कुठेतरी घेऊन जायचे असेल तर मुलांसोबत हे ठिकाण फिरण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हे ही वाचा:
Singham Again Box Office Day 1 : पहिल्याच दिवशी अजय देवगणचा Singham Again करेल बंपर कमाई