Monday, December 4, 2023

Latest Posts

तुमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

तुमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी करा 'या' गोष्टी

प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्त्व असते, त्यांनुसार काही लोकं खूप कमी बोलतात तर काही लोकं खूप बोलके असतात.काही लोकं जास्त क्रियाशील असतात तर काही लोकं आळशी असतात. त्यांना आपले विचार वेळेवर मांडता येत नाहीत. अशी मुलं फार लाजाळू असतात, त्यामुळे अश्या मुलांना बोलकं करणं फार अवघड असतं. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही मुलांमधील लाजाळूपणाचा हा स्वभाव कमी करू शकता आणि लाजाळू मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकता.चला तर जाणून घेऊयात या टिप्स बद्दल.

लाजाळू मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवावा?

कोणत्याही मानसिक किंवा शाररिक दृष्टिकोनातुन पाहिले तर आपल्या मुलांचा चांगला विकास करणे ही जबाबदारी आपली असते. मुलांचे संगोपन चांगले करण्यासाठी मुलांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवा.

स्वतःच्या मुलाची तुलना इतर मुलांशी करू नका

प्रत्येक मुलाची स्वतःची वेगळी अशी क्षमता असते जी बाकीच्या मुलांपासून वेगळी असते, म्हणून एका मुलाची तुलना दुसऱ्या मुलासोबत करू नये. या तुलनेमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो.

तुमच्या मुलांचे चांगले मित्र व्हा

जर तुमचे मूल तुमच्याबरोबर आणि घरात इतर सदस्यांबरोबर सामान्यपणे हसत- खेळत राहत असेल. पण, घराबाहेर पडताच तो पूर्णपणे शांत होत असेल, तर तुमच्या मुलाला सर्वांसमोर ओरडू नका. त्यांच्या समस्या नीटपणे समजून घ्या. थोडक्यात, आपल्या मुलांचे चांगले मित्र व्हा त्यामुळे तुम्हाला तुमचं मूल एक चांगला मित्र समजेल ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास देखील वाढेल .

नव-नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करा

तुमच्या मुलांना नव-नवीन उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्या, हे त्यांना इतर मुलांच्या आसपास राहून त्यांची कौशल्ये विकसित करण्यास मदतशीर ठरेल आणि तुमचे मूल इतर मुलांशी चांगल्याप्रकारे संवाद साधण्यास देखील शिकेल.

तुमच्या मुलाचे आदर्श व्हा

प्रत्येक मुलासाठी त्यांचे पालक हेच आदर्श असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये हव्या असलेल्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अंमलात आणाव्या लागतील, म्हणजेच तुम्ही स्वतःच तुमच्या मुलांचे आदर्श व्हा ज्यामुळे तुमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढेल.

हे ही वाचा : 

अभिनेत्री तमन्ना भाटियाचा हटके अंदाज

वसई – विरार महानगरपालिकेवर मनसेचा विक्रमी महामोर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss