Saturday, June 3, 2023

Latest Posts

डोळ्यांखालील Dark Circles घालवण्यासाठी करा ‘हा’ उपाय

माणसाची डोळे ही मुख्य ओळख असते.आकर्षक डोळे हे प्रत्येकालाच हवे असतात. परंतु अनेकांना डार्क सर्कलच्या समस्येला तोंड द्यावे लागते. ज्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य कमी होते.

माणसाची डोळे ही मुख्य ओळख असते.आकर्षक डोळे हे प्रत्येकालाच हवे असतात. परंतु अनेकांना डार्क सर्कलच्या समस्येला तोंड द्यावे लागते. ज्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य कमी होते. रात्र रात्रभर जागरण केल्याने ही समस्या उद्भवते. अनेकांना या समस्येचा प्रचंड त्रास होतो. डार्क सर्कल्स लवकर बरे व्हावेत म्हणून अनेक महागडी औषध व विविध उपाय आपण करतो. परंतु यामुळे डार्क सर्कल्स बरे न होता आणखीनच वाढू लागतात. म्हणूनच डार्क सर्कल घरच्या घरी त्वरित घालवण्यासाठो रामबाण असा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

डोळ्यांखाली डार्क सर्कल निर्माण होण्याचे कारण झोप न होणे इतकेच नसते तर अनेक कारणं डार्क सर्कलची समस्या निर्माण करतात. यातील बरीचशी कारणं ही दैनंदिन जीवनाशी निगडित असतात. अनेकांच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल येण्यामागे अनुवांशिकता हे कारण असतं. मोबाइल, लॅपटॉप आणि टीव्ही इत्यादींच्या स्क्रीनवर सतत लक्ष केंद्रित केल्यानं डोळ्यांवर ताण येतो. त्याचा परिणाम म्हणूनही डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणता घरगुती उपाय केल्याने ही काली वर्तुळं पुसत होण्यास तसेच निघून जाण्यास मदत होईल.

आज आम्ही तुमच्यासाठी “दही आय मास्क” घेऊन आलो आहोत. दही आणि हळदीच्या एकत्रित करून हा मास्क तयार केला जातो. दही डोळ्यांना थंडावा देते. त्याचबरोबर हळद आपल्या डोळ्यांखालील काळेपणा दूर करण्यास मदत करते. या मास्क चा वापर करून तुम्ही जिद्दी डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवू शकता. चला तर मग बघुयात “दही आय मास्क” कसा तयार करावा.

“दही आय मास्क” बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

दही – १ चमचा
हळद – १ चमचा
लिंबाचा रस – १ चमचा

“दही आय मास्क” बनवण्याची कृती –

एका वाटीत दही आणि एक चमचा हळद घावी. तसेच त्यात एक चमचा लिंबाचा रस घालून एकजीव करून गुळगुळीत पेस्ट तयार करून घावी. अशा प्रकारे “दही आय मास्क” तयार आहे. या “दही आय मास्क” चा वापर १५ ते २० मिनिटे नियमित केल्याने डोळ्या खालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

अखेर प्रतीक्षा संपली!, HSC चा निकाल उद्या दुपारी २ वाजता जाहीर होणार

अखेर प्रतीक्षा संपली!, HSC चा निकाल उद्या दुपारी २ वाजता जाहीर होणार

Brothers Day निम्मित पोस्ट चर्चेत; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून Raj Thackeray भावुक, छान दिवस होते…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss