spot_img
spot_img

Latest Posts

प्रवास करताना तुम्हालाही उलट्या होतात का?करा ‘हे’ सोपे उपाय

अनेकांना लांबचा प्रवास करायला खूप आवडतो. पण बराचवेळा अनेकांना प्रवासादरम्यान उलट्या(Vomiting) किंवा मळमळ होण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे ते अस्वस्थ होतात. मग या परिस्थितीत प्रवासाची सगळी मज्जाच खराब होऊन जाते.

अनेकांना लांबचा प्रवास करायला खूप आवडतो. पण बराचवेळा अनेकांना प्रवासादरम्यान उलट्या(Vomiting) किंवा मळमळ होण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे ते अस्वस्थ होतात. मग या परिस्थितीत प्रवासाची सगळी मज्जाच खराब होऊन जाते. या त्रासामुळे अनेक वेळा अशा लोकांना कुठेही जायला आवडत नाही. बसमधून किंवा कारमधून प्रवास करताना उलट्या होत असतात, त्यामुळे संपूर्ण प्रवासाची मज्जाच बिघडते. गाडीत बसल्यावर उलट्या होणे, याला ‘मोशन सिकनेस'(Motion sickness) असे म्हणतात. ही सामान्य समस्या आहे, जी मुले आणि प्रौढ दोघांनाही होऊ शकते. मळमळणे, उलट्या, चक्कर येणे, डोकेदुखी आणि घाम येणे ही सर्व मोशन सिकनेसची लक्षणे आहेत. मोशन सिकनेस हा काही गंभीर आजार नाही, परंतु प्रवासादरम्यान खूप अस्वस्थ परिस्थिती निर्माण होते. अश्यावेळी सोपे उपाय केले तर तुम्हाला मोठी मदत होऊ शकते.

कारमध्ये योग्य सीट निवड (Choosing the right seat in the car)
कारमध्ये प्रवास करताना आपण सुरुवातीला कारच्या पुढंच्या सीटची निवड करा. लांबचा प्रवास असल्यास योग्य सीट निवडल्याने प्रवासात अडचणी येत नाहीत. कारच्या पुढच्या सीटवर बसल्याने तुम्हाला तिथे खूप आरामदायी वाटेल. त्यानंतर कारच्या खिडक्या उघड्या ठेवा त्यामुळे जास्त ताजी हवा घेईल. कारच्या खिडक्या उघड्या ठेवून नैसर्गिक हवा घेण्याचा प्रयत्न करा.

साधे अन्न घ्या (Eat simple food)
कारमधून प्रवास करण्यापूर्वी हलके जेवण घ्या. खूप तेलकट , तिखट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नये. प्रवासात असताना काळी मिरी आणि लवंग चोखत राहा. भरपूर पाणी पिणे. प्रवासापूवी दही आणि डाळींबाचे सेवन केल्याने प्रवासात उलटीचा त्रास होणार नाही. फक्त दही खाण्याचाही फायदा होतो.
सकाळी प्रवास करण्याआधी एका ग्लासात जिरे , धने आणि बडीशेप मिसळून संपूर्ण रात्र भिजवून ठेवा. प्रवास करत असताना तुमच्या सोबत एका डब्यात भात आणि साजूक तुप ठेवावे. उलटी होतेय असे वाटल्यास हे खावे. हे खाल्ल्याने तुम्हाला खूप आराम मिळू शकतो.

केळी खाणे (eating bananas)
लोक बराच वेळा केली खराब होतात म्हणून ती प्रवास करताना घेत नाही. पण केळ हे प्रवास करताना खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियन आणि फायबर(fiber) असते. जे आपल्याला उलटी होईल असे वाटत असल्यात लगेच केळी खायला पाहिजे. त्यामुळे प्रवास करताना नेहमी तुमच्या सोबत केळी ठेवा. याने उलटी होण्याची समस्या निर्माण होणार नाही. त्या सोबतच प्रवास आरामदायी होईल.

आले खाणे (eat ginger)
आले हा उत्तम पर्याय मानले जाते. आल्याचा तुकडा, लिंबू आणि काळे मीठ घालून हे तोंडात ठेवा . त्यानंतर हळूहळू त्याचा रस घ्या. यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल. याशिवाय आल्याचे पाणी तयार करून हे तुम्ही प्रवासात पिऊ शकता.पटकन उलटी होईल असे वाटल्यास पटकन आल्याचे पाणी पिऊन घ्या. त्याने तुम्हाला आरामदायी वाटेल.

लिंबाचा रस पिणे (Drink lemon juice)
लिंबाच्या औषधी गुणधर्माबद्दल सर्वाना माहितीच आहे. प्रवास असताना लिंबू सोबत ठेवले पाहिजे. लिंबू कापून आणि काळे मीठ टाकून त्याचा रस हळूहळू चोखत राहा. यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल. प्रवास करत असताना नेहमी तुमच्या सोबत लिबु ठेवा. त्याशिवाय तुम्ही लिंबूचे पाणीही पिवू शकता. त्याने तुम्हहाल तरतरी येईल.

कारमध्ये मोबाईल पाहणे टाळा. (Avoid looking at mobile phones in the car.)
कारमध्ये मोबाईल पाहणे टाळा त्याऐवजी कारच्या खिडक्या उघड्या ठेवून जास्तीत जास्त हवा घेण्याचा प्रयत्न करा. तुमचे लक्ष मोबाईल मध्ये न देता ते आजूबाजूच्या परिसराकडे द्या. त्याने तुमचे लक्ष वेधले जाईल आणि प्रवासात तुम्हाला खूप आराम मिळेल आणि कारमध्ये उलट्या टाळण्यासाठी औषधे घ्या. पण औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

 

हे ही वाचा: 

5 Healthy Fruit Juice,पचनाच्या समस्यांसाठी ‘या’ ज्यूसचा आहारात करा समावेश

४ आठवडे आधीच कळतात तुम्हाला Heart Attack ची लक्षणे,

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss