Saturday, June 3, 2023

Latest Posts

काजू खाताय ? मग ही बातमी नक्की वाचा तुमच्या आरोग्य वर होऊ शकतो मोठा परिणाम!

बदाम, मनुके व काजू हा सुखामेवा खायला प्रत्येकालाच आवडतो. काजू म्हणजे सुख्यामेव्यातील खजिनाच जो प्रत्येकजण आवडीने खातो. काजूमुळे शरीरातील हाडे माजबूत होतात व आपली त्वचा ही निरोगी राहते.

बदाम, मनुके व काजू हा सुखामेवा खायला प्रत्येकालाच आवडतो. काजू म्हणजे सुख्यामेव्यातील खजिनाच जो प्रत्येकजण आवडीने खातो. काजूमुळे शरीरातील हाडे माजबूत होतात व आपली त्वचा ही निरोगी राहते. परंतु हेच काजू खाऊन आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होऊ शकतात.

अतिप्रमाणात काजूचे सेवन केल्यानं आपल्या शरीरातील सोडियम चे प्रमाण अनावश्यक रित्या वाढू शकते, कारण काजूंमध्ये सोडिअम आढळून येते यामुळे हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक तसेच हृदयाशी संबंधित आजार अशा समस्या होतात. काजूमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असल्याने ते जास्त प्रमाणात खाणे टाळावे…

काजूच्या सेवनाने नेमके कोणते विकार होऊ शकतात चला जाणून घेण्यात

१) किडनी स्टोन – काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असते, म्हणूनच काजूच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते. जर तुम्हाला आधीच किडनीची समस्या असेल तर काजू खाणे टाळा. २) डिहायड्रेश – काजूमध्ये फायबरचे असते. म्हणूनच जास्त फायबर खाल्ल्यानंतर कमी पाणी प्यायल्यास डिहायड्रेशन होते. शरीरातील फायबर व्यवस्थित विरघळण्यासाठी पाण्याची जास्त आवश्यकता असते. शरीरात जेव्हा जास्त फायबर असते तेव्हा ते शरीरात असलेले पाणी शोषून घेते. म्हणूनच बद्धकोष्ठतेसारख्या समस्याही सुरू होतात. तसेच काजूमुळे आपले वजन देखील वाढू शकते. तसे बघायला गेले तर काजू आपल्या शरीरासाठी चांगले असते पण जास्त कॅलरीज आपल्या शरीराचे वजन वाढवु शकतात म्हणून काजूचे प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे ठरते. ३) फुफ्फुसांशी संबंधित समस्या – काजूमध्ये लोह असते. लोहाचे जास्त सेवन केल्याने पेशींच्या कामावर परिणाम होतो. लोह पेशींमध्ये साठवले जाते. जर ते फुफ्फुसांच्या पेशींमध्ये जमा झाले तर. त्यामुळे दम्याची लक्षणे दिसू शकतात. त्या व्यक्तीला श्वास घेणे कठीण होते.

हे ही वाचा : 

नीराजसिंह राठोड होता तरी कोण ? काय होता भाजपशी संबंध १९ मेपासून ‘कानभट’ ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर उन्हाळ्यात आंब्याचा उपयोग करून उकडीचे मोदक बनवा हटके स्टाईलने…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss