Saturday, June 3, 2023

Latest Posts

दह्यासोबत खाताय का हे पदार्थ? आरोग्यासाठी अतिशय घातक

दही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. दही खाल्याने तुमचे वजनही नियंत्रणात राहते. दह्यामध्ये अनेक पोषक तत्वे आहेत जी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. दह्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. दह्यामुळे आपली त्वचा हि अगदी निरोगी राहते.

दही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. दही खाल्याने तुमचे वजनही नियंत्रणात राहते. दह्यामध्ये अनेक पोषक तत्वे आहेत जी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. दह्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. दह्यामुळे आपली त्वचा हि अगदी निरोगी राहते. दह्याचे सेवन केल्यानं आपल्याला अगदी ताजेतवाने वाटते. दही हे आपल्या हाडांसाठी अतिशय उपयोगी ठरते. दह्यामध्ये योग्य प्रमाणात कॅल्शिअम असून दह्याचे नियमित सेवन केल्याने आपली हाडे मजबूत होतात. दही खाल्याने आपल्या पोटाला थंडावा मिळतो तसेच आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. दह्यामधून आपल्याला व्हिटॅमिन बी 6 (vitamin B 6) व व्हिटॅमिन बी 12 (vitamin B 12) हे आपल्या शरीरासाठी गरजेचे असणारे पोषक घटक भरपूर प्रमाणात मिळतात. दह्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने आपल्या आरोग्याशी निगडित असलेल्या अनेक समस्या दूर होतात. त्यामुळे जेवणासोबत दही खाणे आवश्यक आहे. पण तुम्हाला माहित आहे का काही असे पदार्थ आहेत जे आपण दह्यासोबत खाल्ले तर आपले आरोग्य बिघडू शकते. त्या पदार्थांचे सेवन दह्यासोबत केल्याने आपल्याला अनेक समस्यांना तोंडद्यावे लागेल. चला तंत्र मग जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ.

दह्यासोबत कांदा ( Curd with onion)

तुम्ही जर दह्यासोबत कांदा खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. अनेक लोक हे रायत्यामध्ये कांदा टाकून खातात. पण ते तुमच्या शरीरासाठी अत्यंत वाईट आहे. दह्यामधून कांद्याचे सेवन केल्याने तुम्हाला उलटी, ऍसिडिटी (Acidity) सारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. कांदा आणि दह्याचे खूप वाईट कॉम्बिनेशन आहे.

दह्यासोबत आंबा: (Curd with mango)

उन्हाळा म्हणजे आंबा आलाच. उन्हाळ्यात प्रत्येकजण आंब्यावर ताव मारतात. प्रत्येकाच्या घरी आंबे येतात. त्याशिवाय आंब्याचे वेगवगेळे पदार्थही बनवतात. आपण उन्हाळ्यात आपल्या शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी दह्यासोबत आंबे खातो. प्रत्येकजण दह्यापासून आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतात. पण तुम्हाला माहित आहे का कि दह्यासोबत आंबा खाऊ नये. दही आणि आंबा एकत्र खाल्याने तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. दही हे थंड असून आंबा उष्ण आहे. त्यामुळे हे कॉम्बिनेशन आपल्या शरीरासाठी घातक आहे.

दह्यासोबत दूध (Curd with milk)

दह्यासोबत दूध खाणे हे अत्यंत वाईट आहे. दही आणि दूध हे एकाच प्रकारच्या प्रोटीन(protein) पासून बनलेले असतात. दुधाचा कोणताही पदार्थ दह्यासोबत खाल्ला तर आपले आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे दुधाचे पदार्थ दह्यासोबत खाणे टाळा. तुम्ही जर दुधाच्या पदार्थांचे दह्यासोबत सेवन केले तर तुम्हाला जुलाब, पोटात गॅस होण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.

दह्यासोबत मासे (Curd with fish)

तुम्ही दह्यासोबत मासे खात असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. दही आणि मासे यांचं कॉम्बिनेशिअन हे खूप वाईट आहे. मास्यांसोबत दह्याचे कधीही सेवन करू नये. तुमच्या आरोग्याला ते खूप घटक आहे. दही आणि मासे खाल्याने तुम्हाला रस होऊ शकतो. दही आणि मासे या दोघान्मध्येही भरपूर प्रोटीन असतात. त्यामुळे या दोघांचेही एकत्र सेवन केल्याने तुम्हाला अपचन होऊ शकते. मास्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड याचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे तुम्हाला ला त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे मासे आणि दही याचे एकत्र सेवन करू नका आणि अपचन आणि त्वचेच्या समस्यांपासून दूर रहा.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

नैसर्गिकरित्या बनवा घरगुती Hair Pack

अहमदनगरच्या शेवगावमध्ये दोन गटांत राडा

अरबी समुद्रात पकडले १२ हजार कोटींचे ड्रग्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss